Dailyhunt
पुणे महापालिकेत झेंडावंदन,परेड , पुष्पांजली वाहून महाराष्ट्र दिन संपन्न.

पुणे महापालिकेत झेंडावंदन,परेड , पुष्पांजली वाहून महाराष्ट्र दिन संपन्न.

पुणे-

हाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त शुक्रवार दि. ०१ मे २०२६ रोजी महापौर, मंजुषा दीपक नागपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.महापौर, मंजुषा दीपक नागपुरे यांनी पुणे महानगरपालिके च्या प्रांगणातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्टीत पुतळ्यास पुष्प अर्पण केली.

त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण केली. त्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

तसेच ध्वजारोहणा पूर्वी राष्ट्रीयगीत (वंदे मातरम) म्हणण्यात आले. सकाळी ७.१० वाजता महापौर मंजुषा दीपक नागपुरे यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आले. यावेळेस राष्ट्रगीत व महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणण्यात आले.
या प्रसंगी महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) श्रीमती पवनीत कौर व अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, नगरसचिव योगिता भोसले आणि विविध विभागांचे खातेप्रमुख, उपायुक्त,अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi