Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्याच्या सीएनजी-पीएनजी पुरवठा व्यवस्थेला मोठी चालना

पुण्याच्या सीएनजी-पीएनजी पुरवठा व्यवस्थेला मोठी चालना

MNGL-GAIL कडून तळेगाव येथे गॅस पुरवठा क्षमता वाढविण्याचे काम पूर्ण

पुणे : महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL) ने पुणे शहरातील नैसर्गिक वायू पुरवठा नेटवर्क अधिक सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

GAIL आणि MNGL यांच्या संयुक्त प्रयत्नांतून तळेगाव येथील आरटी स्टेशनवरील गॅस हँडलिंग स्किडची क्षमता 75,000 SCMD वरून 7,00,000 SCMD (0.7 MMSCMD) इतकी वाढविण्यात आली आहे. या वाढीव क्षमतेच्या स्किडचे यशस्वी कमिशनिंग व नेटवर्कमध्ये एकत्रीकरण 11 सप्टेंबर 2026 रोजी पूर्ण झाले.

पुणे गॅस नेटवर्क मजबूत करण्याच्या या उपक्रमांतर्गत MNGL ने टप्प्याटप्प्याने व्यापक नेटवर्क ऑगमेंटेशन कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये गॅस पुरवठा क्षमता वाढविणे, नेटवर्कमधील दाब सुधारणा, पाइपलाइन पायाभूत सुविधा मजबूत करणे, पर्यायी गॅस पुरवठा मार्ग निर्माण करणे तसेच CNG पुरवठ्याची विश्वासार्हता वाढविणे यांचा समावेश आहे.

तळेगाव येथे दोन प्रमुख कामे पूर्ण

या नेटवर्क सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत तळेगाव येथे तीन प्रमुख कामे नियोजित करण्यात आली होती. त्यापैकी दोन महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत.

  1. तळेगाव पाइपलाइन लूपिंग :
    तळेगाव येथे पाइपलाइन लूपिंगचे काम ऑगस्ट 2026 च्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण करण्यात आले. यामुळे आरटी तळेगाव येथून आरटी पुणे (चिखली)च्या दिशेने MNGL च्या पुणे नेटवर्कमध्ये गॅस पुरवठा अधिक सक्षमपणे करता येणार आहे. त्यामुळे नेटवर्क कनेक्टिव्हिटी, पुरवठ्याची लवचिकता आणि पर्यायी मार्गांची उपलब्धता वाढली आहे.
  2. तळेगाव स्किड अपग्रेडेशन :
    तळेगाव येथील विद्यमान 75,000 SCMD क्षमतेच्या स्किडऐवजी 0.7 MMSCMD क्षमतेचा नवीन स्किड बसविण्यात आला आहे. संबंधित पाइपिंग, हुक-अप आणि इंटिग्रेशनची कामेही पूर्ण करण्यात आली आहेत.

या दोन्ही कामांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे पुणे शहराच्या नैसर्गिक वायू वितरण नेटवर्कमध्ये पुरवठ्याची लवचिकता, नेटवर्क रिडंडन्सी आणि एकूण विश्वासार्हता लक्षणीयरीत्या वाढली आहे.

महत्त्वाचे परिणाम

  • तळेगाव येथील गॅस हँडलिंग क्षमता 75,000 SCMD वरून 0.70 MMSCMD पर्यंत वाढली.
  • पुणे गॅस नेटवर्कसाठी सुमारे 3 लाख SCMD अतिरिक्त थ्रूपुट क्षमता उपलब्ध झाली आहे.
  • भविष्यातील मागणी लक्षात घेऊन हॉट-टॅपिंगद्वारे पुढील क्षमतेच्या वाढीसाठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
  • पुणे CGD नेटवर्कच्या दूरच्या भागांमध्ये सुमारे 1.5 बारपर्यंत दाब उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे.
  • CNG स्टेशन्सचा अखंडित पुरवठा सुनिश्चित करण्यास तसेच कमी नेटवर्क दाबामुळे होणाऱ्या अडचणी टाळण्यास मदत होणार आहे.
  • नेटवर्कची रिडंडन्सी, ऑपरेशनल लवचिकता आणि एकूण गॅस पुरवठा विश्वासार्हता मजबूत झाली आहे.
  • वाढत्या मागणीच्या काळात तसेच नवीन CNG स्टेशन्स व PNG ग्राहकांची भर पडताना आवश्यक असलेली अतिरिक्त क्षमता उपलब्ध होणार आहे.

तिसऱ्या टप्प्यात पाइपलाइन अपग्रेडेशनचे काम सुरू

नेटवर्क सक्षमीकरणाच्या पुढील टप्प्यात हॉट-टॅपिंगद्वारे पाइपलाइन अपग्रेडेशनचे काम सध्या GAIL मार्फत सुरू आहे. तळेगाव येथील विद्यमान 4-इंच पाइपलाइन 8-इंच पाइपलाइनमध्ये अपग्रेड करण्यात येत असून हे काम 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

या टप्प्याटप्प्याने राबविण्यात येत असलेल्या नेटवर्क सक्षमीकरण कार्यक्रमामुळे पुणे परिसरातील नैसर्गिक वायू वितरण व्यवस्था अधिक विश्वसनीय, सक्षम आणि भविष्यातील मागणीसाठी सज्ज होणार आहे. पूर्ण झालेल्या व सुरू असलेल्या या कामांमुळे गॅस उपलब्धता वाढणे, नेटवर्कमधील दाबाची स्थिती सुधारणे, CNG ऑपरेशन्स अखंडित ठेवणे आणि पुणे गॅस क्षेत्रातील नैसर्गिक वायूची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त क्षमता निर्माण होण्यास मदत होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi