Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यात ईव्हीएम गोदाम, मतदान केंद्र व एसआयआर कामकाजाची प्रधान सचिवांकडून पाहणी

पुण्यात ईव्हीएम गोदाम, मतदान केंद्र व एसआयआर कामकाजाची प्रधान सचिवांकडून पाहणी

पुणे : भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव मा. व्ही. सी. पात्रा यांनी पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यादरम्यान निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित विविध यंत्रणांची पाहणी करून कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी रावेत येथील ईव्हीएम (EVM) गोदाम तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राला भेट देऊन तेथील व्यवस्थापन, सुरक्षितता आणि कार्यपद्धतीची प्रत्यक्ष पाहणी केली.

त्यानंतर दुपारच्या सत्रात भारत निवडणूक आयोगाच्या एसआयआर (Special Intensive Revision) अंतर्गत खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या मतदान नोंदणी कार्यालयाला भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान एसआयआर अंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला.

एसआयआर प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीचे विशेष पुनरीक्षण, नवीन पात्र मतदारांची नोंदणी, विद्यमान मतदारांच्या माहितीतील दुरुस्ती, पत्त्यातील बदलांची नोंद, मृत अथवा अपात्र मतदारांची नावे वगळणे तसेच मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि पारदर्शक ठेवण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यपद्धतींची माहिती प्रधान सचिवांना सादर करण्यात आली. याशिवाय पात्र मतदारांचा समावेश सुनिश्चित करणे, नोंदींची पडताळणी आणि नागरिकांना सुलभ व वेळेवर सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचाही आढावा घेण्यात आला.

या पाहणीदरम्यान जिल्हा उपनिवडणूक अधिकारी मीनल कळसकर, हवेली प्रांत अधिकारी तथा खडकवासला विधानसभा निवडणूक अधिकारी डॉ. यशवंत माने, हवेली तहसीलदार अर्चना निकम, नायब तहसीलदार सचिन आखाडे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. संबंधित अधिकाऱ्यांनी एसआयआर अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रक्रियांची माहिती सादर करत कामकाजाची सद्यस्थिती स्पष्ट केली.

यावेळी मा. पात्रा यांनी सर्व विभागांचे काम बारकाईने पाहून मतदार नोंदणी प्रक्रियेतील अचूकता, माहितीची काटेकोर पडताळणी, नोंदींचे वेळोवेळी अद्ययावतीकरण आणि संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. नागरिककेंद्रित सेवा आणि कार्यक्षम नोंदणी व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी संबंधित विभागांच्या कामकाजाचे कौतुक केले तसेच आतापर्यंत झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi