Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यांची पुनर्स्थापना करा- खर्डेकर

राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यांची पुनर्स्थापना करा- खर्डेकर

पुणे- श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी व गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्यांची पुनर्स्थापना करावी अशी जोरदार मागणी आता होऊ लागली आहे .संदीप खर्डेकर,भालचंद्र कुलकर्णी,ॲड. सौ. ईशानी जोशी,विश्वजीत देशपांडे यांनी त्यासाठी महापौर मंजुश्री नागपुरे यांना साकडे घातले आहे.

खर्डेकर म्हणाले कि,' महापालिकेच्या छत्रपती संभाजी उद्यानात (जंगली महाराज रोडवरील) नुकतेच छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे राज्याचे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, याबद्दल सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने आपले मनापासून अभिनंदन करीत आहोत. शंभूराजांचा तेजस्वी पुतळा तितक्याच सुशोभनीय पध्दतीने बसवण्यात आला आहे, याचा आम्हा सर्वांना अत्यंत आनंद आहे.
काही समाजकंटकांच्या चिथावणीखोर वक्त्यव्यांमुळे तसेच सामाजिक सौहार्दता टिकवण्यासाठी काही महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजी उद्यानातील श्रेष्ठ नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा काढून टाकण्यात आला आहे. श्रेष्ठ लेखक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील नेते आचार्य प्र. के. अत्रे यांनी हा पुतळा संभाजी उद्यानात बसवला होता. त्यामुळे सदरच्या राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची सुयोग्य ठिकाणी सन्मानाने पुनर्स्थापना करावी अशी आमची मागणी आहे.

त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी लाल महालात असलेल्या गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचा पुतळा देखील सामाजिक असंतोषामुळे काढून टाकला होता व सद्यस्थितीत हा पुतळा सिंहगड रस्त्यावरील पु. ल. देशपांडे उद्यानात वाईट अवस्थेत पडून आहे. सदरचा पुतळा देखील पुणे शहरात सुयोग्य ठिकाणी पुन्हा सन्मानाने बसवण्यात यावा अशी आमची सर्वांची एकमुखी मागणी आहे.
आम्ही खालील सह्या करणारे सकल ब्राह्मण समाज (पुणे शहर) पदाधिकारी म्हणून प्रातिनिधीक सह्या करीत आहोत. पुणे शहरातील सुमारे ३५ ब्राह्मण संस्था / संघटना या सकल ब्राह्मण समाज संघटनेच्या सदस्य आहेत. पुणे शहरातील सर्वच समाजातील महापुरुषांच्या जयंती / पुण्यातिथीनिमित्ताने संबंधित पुतळ्यांबाबत पुणे महापालिका सन्मानाने यथोचित कार्यक्रम करीत असते, अशा वेळी वरील नमूद दोन्ही महापुरुषांच्या पुतळ्यांचा सन्मान राखून त्यांची सुयोग्य ठिकाणी पुनर्स्थापना करावी व सन्मान राखला जावा, अशी आमची आग्रहाची मागणी व विनंती आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi