Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रात्री दहा नंतर पब,बार देखील बंद ठेवा: आम आदमी पार्टी

रात्री दहा नंतर पब,बार देखील बंद ठेवा: आम आदमी पार्टी

पुणे:जवळपास ऐंशी लाख लोकसंख्येच्या पुणे शहर व परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे.गुनहेगारी रोखण्यासाठी रात्री दहा नंतर पब,बार, रेस्टॉरंट हाँटेल बंद ठेवण्याचा निर्णय पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतला आहे.

या निर्णयास पुणे शहर आम आदमी पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे.

आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांच्या नेतृत्वाखाली महासचिव सुभाष करांडे, महासचिव सुनील सवदी, सागर झा, मिलिंद सरोदे, अविनाश भाकरे, उमेश दीक्षित, अनिकेत शिंदे, महिला आघाडीच्या ज्योती जोगदंड आणि मनोज ओझा यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची पोलीस मुख्यालयात भेट घेऊन त्यांना हा निर्णय कायमस्वरूपी लागु करण्यात यावा असे साकडे घातले..
आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले,
कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी शहरात दोन आठवडे जमावबंदी जारी केली आहे.
याच बरोबर रात्री दहा नंतर सर्व पब, बार, रिसॉर्ट आदी बंद ठेवण्याची अमंलबजावणी सुरू केली. सिंहगड रोड,वारजे माळवाडी धायरी नऱ्हे, कात्रज आंबेगाव धनकवडी बिबवेवाडी हडपसर आदी ठिकाणी संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय आहेत. राजकीय वरदहस्तामुळे मध्यरात्री पासुन पहाटे पर्यंत गुन्हेगारी टोळ्या मद्यपान पार्टी करुन मुख्य रस्ते सोसायट्या लोकवस्त्यांत अशा सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालुन दहशत निर्माण करत आहेत. टोळी युध्दात अनेक गुन्हेगार ठार झाले आहेत त्यामुळे नागरिकांत प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे रात्री घरी परत जाणे तसेच घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. त्यामुळे रात्री दहा नंतर सर्व पब हाँटेल ,बार बंद ठेवण्याचा निर्णय समाजाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा आहे.
यावेळी मिरवणुकांमुळे निर्माण होणारे ट्राफिक जॅम, रुग्णवाहिकांना होणारा अडथळा, ध्वनीप्रदूषण तसेच महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास याबाबत पोलीस आयुक्तांना आम आदमी पक्षाच्या सविस्तर निवेदन देण्यात आले. नागरिकांच्या शांतता, सुरक्षितता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi