Dailyhunt
शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे,बच्चू कडू निश्चित,झिशान सिद्दीकींचा अर्ज दाखल

शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे,बच्चू कडू निश्चित,झिशान सिद्दीकींचा अर्ज दाखल

मुंबई -विधान परिषद निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. उमेदवारी निश्चित झाल्याने निवडणुकीतील समीकरणे अधिक स्पष्ट होत आहेत.

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून बच्चू कडू, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांची वर्णी लागली आहे. दुसरीकडे, ​मात्र, काँग्रेसच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi