Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
स्टार हेल्थने आर्थिक वर्ष 27 च्या पहिली तिमाहीमध्ये नोंदवला 550 कोटी रु. करपश्चात नफा

स्टार हेल्थने आर्थिक वर्ष 27 च्या पहिली तिमाहीमध्ये नोंदवला 550 कोटी रु. करपश्चात नफा

र्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीतील 16 कोटी रु.च्या तुलनेत अंडररायटिंग नफा 111 कोटी रु. पर्यंत झेपावला

चेन्नई, 29 जुलै2026: भारतातील सर्वात मोठी स्वतंत्र आरोग्य विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ('स्टार हेल्थ') ने आज 30 जून 2026 रोजी संपलेल्या तिमाहीचे (आर्थिक वर्ष 27 ची पहिली तिमाही) आर्थिक निकाल जाहीर केले.

भारतीय लेखा मानके (Ind AS) अंतर्गत कंपनीने 550 कोटी रु. करपश्चात नफा (PAT) नोंदवला असून त्यात वार्षिक 25% वाढ झाली आहे. प्रीमियममधील सक्षम वाढ, शिस्तबद्ध अंडररायटिंग आणि सातत्यपूर्ण कामकाज कार्यक्षमता यांच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीतील अंडररायटिंग नफा 111 कोटी रु. इतका झेपावला. आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीतील 16 कोटी रु.च्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे.

आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीने एकूण लिखित प्रीमियम (GWP) 4,287 कोटी रु. नोंदवला असून, रिपोर्टेड 1/N आधारावर त्यात वार्षिक 19% वाढ झाली आहे. याच आधारावर तिमाहीतील फ्रेश रिटेल हेल्थ GWP 730 कोटी रु. इतका राहिला असून, त्यात वार्षिक 37% वाढ झाली आहे.

आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीतील कामगिरीची ठळक वैशिष्ट्ये

व्यवसाय कामगिरी

  • GWP (रिपोर्टेड 1/N आधारावर) वार्षिक 19% वाढून 4,287 कोटी रु.
  • रिटेल हेल्थ फ्रेश GWP (रिपोर्टेड 1/N आधारावर) वार्षिक 37% वाढून 730 कोटी रु.

आर्थिक कामगिरी (Ind AS)

  • अंडररायटिंग नफा: 111 कोटी रु. (वार्षिक 6 पट वाढ | आर्थिक वर्ष 26 ची पहिली तिमाही: 16 कोटी रु.)
  • करपश्चात नफा (PAT): 550 कोटी रु. (वार्षिक 25% वाढ | आर्थिक वर्ष 26 ची पहिली तिमाही: 438 कोटी रु.)
  • एकत्रित विमा सेवा गुणोत्तर (Combined Insurance Service Ratio - CISR): 97.0% (आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीतील 98.7% च्या तुलनेत 1.7% सुधारणा)

अल्पकालीन मार्क-टू-मार्केट अस्थिरतेपासून नफाक्षमता वेगळी दर्शविण्यासाठी कंपनी 8% सामान्यीकृत (वार्षिकीकृत) गुंतवणूक परताव्याच्या आधारावर 'सामान्यीकृत PAT' जाहीर करते. सामान्यीकृत PAT मध्ये वार्षिक 44% वाढ झाली असून तो आर्थिक वर्ष 26 च्या पहिल्या तिमाहीतील 267 कोटी रु. वरून आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 386 कोटी रु. झाला आहे.

दावे निकाली काढण्यातील उत्कृष्टता आणि ग्राहकांचा विश्वास

  • आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीमध्ये स्टार हेल्थने 9.6 लाख दावे निकाली काढले.
  • रिटेल दावे निकाली काढण्याचे प्रमाण 1% ने सुधारून आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीमध्ये 91% वर पोहोचले.
  • पर्सिस्टन्सीमध्ये वार्षिक 3% सुधारणा होऊन ती 102% झाली.
  • कंपनीचा नेट प्रमोटर स्कोअर (NPS) 12 गुणांनी सुधारून जून 2026 अखेर 65 वर पोहोचला.

डिजिटल-प्रथम दृष्टिकोन

आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीसाठी डिजिटल माध्यम हे वाढ आणि कार्यक्षमतेचे महत्त्वाचे साधन राहिले. या तिमाहीमध्ये कंपनीच्या मालकीच्या डिजिटल D2C चॅनेलचा नवीन रिटेल विक्रीमध्ये 16% वाटा राहिला असून त्यात वार्षिक 142% वाढ झाली.

नवीन पॉलिसींपैकी 97% पॉलिसी डिजिटल माध्यमातून प्राप्त झाल्या. त्यातून व्यापक रिटेल वितरण व्यवस्थेत डिजिटल स्वीकार मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून आले. कंपनीने व्यवसाय संपादनासाठी विकसित केलेल्या AI-सक्षम डिजिटल प्लॅटफॉर्म ATOM PRO द्वारे आपल्या तंत्रज्ञानाधारित क्षमताही अधिक मजबूत केल्या असून या प्लॅटफॉर्मचा वापर सातत्याने वाढत आहे. एंड-टू-एंड उत्पादकता प्लॅटफॉर्म म्हणून विकसित करण्यात आलेले ATOM PRO सल्लागारांना बुद्धिमान उत्पादन शिफारसी, तत्काळ कोटेशन, पॉलिसी तुलना, नेटवर्क हॉस्पिटल शोध, व्यवसाय डॅशबोर्ड तसेच इतर डिजिटल सेवा सुविधा उपलब्ध करून देते. यामुळे ग्राहकांशी संवाद अधिक प्रभावी होण्यासोबतच सल्लागारांची उत्पादकता वाढण्यास मदत होते. द इकॉनॉमिक टाइम्स आयोजित बीएफएसआय फिननेक्स्ट अवॉर्ड्स 2026 मध्ये 'इन्शुअरटेक प्रॉडक्ट एक्सलन्स ऑफ द इयर' या श्रेणीत ATOM PRO ला सन्मानित करण्यात आले.

स्टार हेल्थ कस्टमर अॅपलाही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अॅपचे 14.7 दशलक्ष डाउनलोड्स झाले असून, दरमहा 1.5 दशलक्षांहून अधिक सक्रिय वापरकर्ते आहेत. डिजिटल नूतनीकरण, दावे सादर करणे आणि वेलनेस उपक्रमांसारख्या स्वयं-सेवा सुविधांचाही वापर सातत्याने वाढत आहे.

कंपनी संपूर्ण मूल्यसाखळीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित उपाययोजना राबवत असून, त्यावर व्यवस्थापनाचे विशेष लक्ष आहे. विशेषतः, AI-ML अॅनालिटिक्सच्या सहाय्याने दावे प्रक्रिया अधिक अचूक आणि कार्यक्षम करण्यात आली आहे. याशिवाय, परिणाम अधिक प्रभावी करण्यासाठी कंपनी आता जनरेटिव्ह एआय क्षमतांचा समावेश करण्याच्या प्रक्रियेत आहे. जागतिक तंत्रज्ञान भागीदारीद्वारे कंपनीने एआय क्षेत्रातील स्वतःच्या अंतर्गत क्षमताही अधिक बळकट केल्या आहेत.

वितरण जाळ्याची ताकद

आर्थिक वर्ष 27 च्या पहिल्या तिमाहीमध्ये स्टार हेल्थचे मजबूत वितरण जाळे आणि सेवा देणारी पायाभूत सुविधा यांनी कंपनीच्या वाढीला सातत्याने पाठबळ दिले. 30 जून, 2026 रोजी कंपनीकडे 900 हून अधिक शाखा कार्यालये, 8.5 लाखांहून अधिक एजंट्स, 16,000 हून अधिक नेटवर्क हॉस्पिटल्स आणि 18,500 हून अधिक कर्मचारी यांचा समावेश असलेले बहुविध वितरण जाळे होते. तंत्रज्ञान, डिजिटल सक्षमकरण आणि ग्राहक सेवेमधील सातत्यपूर्ण गुंतवणुकीच्या बळावर कंपनी देशभरात दर्जेदार आरोग्य विम्याचा विस्तार करत शाश्वत वाढ साध्य करण्यासाठी सक्षम स्थितीत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रतिक्रिया

कंपनीच्या कामगिरीबाबत भाष्य करताना स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. आनंद रॉय म्हणाले,

'पहिल्या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या व्यवसायाच्या भक्कम पायाभूत तत्त्वांचे आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणीचे प्रतिबिंब आहे. शाश्वत वाढ, अंडररायटिंग नफ्यात सातत्याने होत असलेली सुधारणा आणि कामकाजामधील शिस्त यामुळे आम्हाला आर्थिक वर्षाची दमदार सुरुवात करता आली आहे. विवेकी जोखीम निवड कायम राखत देशभरात आरोग्य विम्याची व्याप्ती वाढविणे आणि ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देणे यावर आमचा भर कायम आहे. डिजिटल क्षमता, एआय प्रणीत नाविन्यपूर्णता आणि वितरण जाळ्यातील गुंतवणूक ग्राहकांना अधिक कार्यक्षमतेने आणि व्यापक स्तरावर सेवा देण्याची आमची क्षमता सातत्याने वाढवत आहे. भारतात आरोग्य विम्याचा स्वीकार अधिक व्यापक होत असताना, आमच्या पॉलिसीधारक आणि भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करणारी, लवचिक आणि डिजिटल-फर्स्ट संस्था उभारण्याबाबत आम्ही कटिबद्ध आहोत.'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi