Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
स्वच्छता स्पर्धेत १५ क्षेत्रीय कार्यालयांची चुरस ; विजेत्यांसाठी ९० लाखांचा निधीला मान्यता

स्वच्छता स्पर्धेत १५ क्षेत्रीय कार्यालयांची चुरस ; विजेत्यांसाठी ९० लाखांचा निधीला मान्यता

पुणे-लोकनेते स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता सप्ताहात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पुणे महापालिकेच्या तीन क्षेत्रीय कार्यालयांना एकूण ९० लाख रुपयांची रोख बक्षिसे देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता.

या प्रस्त्वाला मान्यात देण्यात आली असून या कामगिरीचे मूल्यांकन त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येणार असून, त्यानंतर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या क्षेत्रीय कार्यालयांची निवड केली जाणार असल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्या निर्देशानुसार २२ ते २८ जुलैदरम्यान स्वच्छता सप्ताह राबविण्यात आला असून, त्यानंतर ५ ऑगस्टपर्यंत विविध स्वच्छता उपक्रम सुरू ठेवण्यात आले आहेत. या मोहिमेत शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांचा सहभाग आहे. सिंहगड रस्त्यावरील विठ्ठल मंदिर परिसरातून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला होता.

या स्पर्धेसाठी सार्वजनिक रस्ते, बसस्थानके, रेल्वे स्थानके, रिक्षा स्टँड, विमानतळ परिसरातील स्वच्छता, शाळांमधील डीप क्लीन ड्राइव्ह, मंडई आणि बाजारपेठांची स्वच्छता, नदी-नाले व तलाव परिसराची स्वच्छता, झोपडपट्ट्या आणि वस्त्यांमधील स्वच्छता, आरआरआर केंद्रांवरील ई-कचरा व प्लास्टिक संकलन, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, क्रॉनिक स्पॉटचे सुशोभीकरण, दंडात्मक कारवाईचे प्रमाण आणि नावीन्यपूर्ण उपक्रम अशा दहा निकषांवर प्रत्येकी दहा गुण देण्यात येणार आहेत. या निकषांवर एकूण १०० गुणांचे मूल्यांकन होईल.

मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर प्रथम क्रमांकाच्या क्षेत्रीय कार्यालयाला ५० लाख, द्वितीय क्रमांकाला २५ लाख आणि तृतीय क्रमांकाला १५ लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. यासाठी एकूण ९० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पातील 'सॅनिटेशन कमिटी व जनजागृती मोहीम' या अर्थशीर्षकातून हा खर्च करण्यात येणार आहे. या अर्थशीर्षकाखाली १३ कोटी रुपयांची तरतूद उपलब्ध असल्याचे प्रशासनाने प्रस्तावात नमूद केले आहे.

स्वच्छता स्पर्धेचे निकष

  • सार्वजनिक रस्ते व वाहतूक केंद्रांची स्वच्छता
  • शाळांमधील डीप क्लीन ड्राइव्ह व जनजागृती
  • मंडई, बाजारपेठा व शासकीय इमारतींची स्वच्छता
  • नदी, नाले, तलाव आदी जलस्रोतांची स्वच्छता
  • झोपडपट्ट्या व वस्त्यांमधील स्वच्छता
  • आरआरआर केंद्रांवर ई-कचरा व प्लास्टिक संकलन
  • सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व देखभाल
  • क्रॉनिक स्पॉटचे सुशोभीकरण
  • दंडात्मक कारवाईचे प्रमाण

* नावीन्यपूर्ण स्वच्छता उपक्रम

बक्षिसांची रक्कम

  • प्रथम : ५० लाख रुपये
  • द्वितीय : २५ लाख रुपये
  • तृतीय : १५ लाख रुपये
  • एकूण पारितोषिक निधी : ९० लाख रुपये
Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi