Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखलेल्या हातांनी लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यास शहर काँग्रेसचा विरोध.

विद्यार्थ्यांच्या रक्ताने माखलेल्या हातांनी लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यास शहर काँग्रेसचा विरोध.

पुणे- दिल्ली येथील जतंर-मंतर मध्ये झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी केंद्र सरकारने लाठी हल्ला आश्रू गॅस व पॅलेट गनचा वापर करून अनेक विद्यार्थ्यांना जखमी केले. अशा विद्यार्थ्यांवर हल्ला करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने भरले आहेत.

लोकमान्य टिळक ट्रस्टच्या वतीने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्याचे ठरविले होते. विद्यार्थ्यांच्या रक्ताने हात माखलेल्या अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक पुरस्कार देणे म्हणजे लोकमान्यांचा अपमान आहे. त्यामुळे पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने त्यांच्या पुणे भेटीच्या वेळेस निषेध करण्याचा निर्णय घेतला. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आंदोलन करण्यासाठी पोलीसांना रितसर परवानगी मागितली होती परंतु सुरुवातीला पोलीसांनी परवानगी नाकारली काँग्रेस पक्षाने आंदोलनाचा आग्रह धरल्यामुळे कार्यक्रमाच्या १ कि. मी. च्या परिसरामध्ये आंदोलन करण्याची परवानगी पोलीसांनी दिली.

''हुकूमशहा अमित शहा गो बॅक'', ''अमित शहा यांचा धिक्कार असो'', ''अदानीला पायघड्या विद्यार्थ्यांना बेड्या'' असे अनेक घोषणांचे फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने निर्देशने केली. यावेळी आपले मनोगत व्‍यक्त करताना पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, ''जतंर - मंतर येथे अंहिसेच्या मार्गाने विद्यार्थी आंदोलन करीत असताना त्यांच्यावर अमानुषपणे लाठीहल्ला, अश्रू गॅस व पॅलेट गनचा वापर करून विद्यार्थ्यांना जखमी केले आणि हे आदेश केंद्रिय गृहमंत्री असलेले अमित शहा यांच्या निगरानीखाली झाले. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्लाला जाबाबदार असलेले अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. संसदेत सुध्दा या विषयावर अमित शहांनी खुलासा केला नाही तर संसदेतून पळ देखील काढला. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्ताने भरलेले असताना लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार देण्यासाठी पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरामध्ये ज्या शहराने या देशाला दिशा देणारे नेते घडविले अशा पुण्यनगरीमध्ये अमित शहा यांचा निषेध करणे हे आमचे कर्तव्‍य आहे. या भावनेतून आम्ही केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहोत.''

यानंतर पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी म्हणाल्या की, ''हुकूमशहा अमित शहा पुण्यामध्ये आलेले असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आंदोलन करणे हा आम्हाला संविधानाद्वारे मिळालेला

अधिकार आहे. मुलींवर लाठीचार्ज करणे व त्यांचा विनयभंग करणारे प्रकार हे अतिशय निदंनीय आहे. 'बेटी बचाव - बेटी पढा ओ' म्हणणारे अमित शहा यांच्या आंदेशाने मात्र महिला व मुलींवर दिल्ली पोलीसांनी हल्ला केला. त्यामुळे अमित शहाने नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा.''

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पूर्व विभागाचे अध्यक्ष प्रशांत जगताप, पश्चिम विभागाच्या अध्यक्षा दीप्ती चवधरी काँग्रेस पक्षाचे पुणे मनपा गटनेते रामचंद्र उर्फ चंदू कदम व इतर पदाधिकारी यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. सदर आंदोलनात पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष लहुअण्णा निवंगुणे, नगरसेवक अरविंद शिंदे, अविनाश साळवे, रफिक शेख, साहिल केदारी, विशाल मलके, अश्विनी लांडगे, दिपाली डोख, सुनिल शिंदे, गोपाळ तिवारी, सुनिल मलके, चंद्रशेखर कपोते, अजित दरेकर, सचिन आडेकर, मेहबुब नदाफ, राजेंद्र शिरसाट, शानी नौशाद, स्वाती शिंदे, अभिजीत गोरे, बाळासाहेब अमराळे, उस्मान तांबोळी, चेतन आगरवाल, लतेंद्र भिंगारे, लता राजगुरू, द. स. पोळेकर, हनुमंत पवार, भाऊसाहेब आजबे, सुरेश कांबळे, रमेश सोनकांबळे, विशाल जाधव, शाबीर खान, सतिश पवार, भरत सुराणा, निलेश बोराटे, संदिप कुदळे, किशोर मारणे, राहुल वंजारी, सुरेश चौधरी, सादिक कुरेशी, दिपक ओव्‍हाळ, कृष्णा सोनकांबळे, अर्चना शहा, सिमा सावंत, अनिता मकवाणी, संतोष सुपेकर, चेतन पडवळ, आसिफ शेख, प्रिया चेरूकुऱ्री, प्राजक्ता जाधव, मिलिंद पोकळे, आबा जगताप, अन्वर शेख, चैतन्य पुरंदरे, गुलामहुसेन खान, मजहर मणियार, आसिफ शेख, प्रथमेश आबनावे, अकबर शेख, फिरोज शेख, वैभव डांगमाळी, संदिप मोकाटे, पुष्कर आबनावे, यासीन शेख, दत्ता जाधव, सुरेश मते, अजय खुडे, सुनिल पंडित, अविनाश अडसुळ, विक्की खन्ना, अवधुत मते, गणेश गुगळे, देविदास लोणकर, दादाश्री कामठे, रामविलास माहेश्वरी, शिवाजी सोनार, अण्णा गोसावी, पांडुरंग गायकवाड आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनास उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi