Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची आसनव्यवस्था होणार अद्ययावत-स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची आसनव्यवस्था होणार अद्ययावत-स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती

पुणे : कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील प्रेक्षकांच्या बैठकीची व्यवस्था अधिक आधुनिक करण्यासाठी खुर्च्या आणि कार्पेट बदलण्याचा सुमारे ७२.६२ लाख रुपयांचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीच्या मंजुरीसाठी सादर केला होता.

या प्रस्तावाला मान्यता दिल्याचे समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

नाट्यगृहातील जुनी झालेली आसनव्यवस्था आणि कार्पेट बदलण्याच्या कामासाठी महापालिकेने ८०.३८ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रक तयार केले होते. त्यानंतर ६८.१२ लाख रुपयांच्या कामासाठी फेरनिविदा मागविण्यात आली.

यामध्ये कॉन्सेप्ट क्रिएटर, आनंदनगर, सिंहगड रस्ता यांनी ६१ लाख ५४ हजार १८६ रुपयांची, म्हणजे अंदाजित रकमेपेक्षा ९.६६ टक्के कमी दराची निविदा सादर केली. तर पेन वर्कर्स या संस्थेने तीन टक्के कमी दराची निविदा भरली. त्यामुळे कॉन्सेप्ट क्रिएटरची निविदा सर्वात कमी दराची ठरली असून तिची शिफारस प्रशासनाने केली आहे.

जीएसटीसह या कामाची एकूण किंमत ७२ लाख ६१ हजार ९४१ रुपये इतकी होणार आहे. विशेष भाववाढ अथवा सर्वसाधारण भाववाढ सूत्रानुसार आवश्यक ते समायोजन करण्याची तरतूदही प्रस्तावात करण्यात आली आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, निविदेतील दर बाजारभावाशी सुसंगत आहेत.

या कामासाठी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद उपलब्ध असून स्थायी समितीची मंजुरी मिळाल्याने संबंधित ठेकेदाराशी करारनामा करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार आहे. या कामामुळे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील प्रेक्षकांना अधिक आरामदायी आसनव्यवस्था आणि सुधारित अंतर्गत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: My Marathi