Friday, 27 Mar, 4.52 pm माय मेडिकल मंत्रा

होम
#CoronaVirus: भारतात कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन नाही, डॉ. गंगाखेडकर

भारतात कोविड-१९ म्हणजे कोरोना व्हायरसने ग्रस्त रुग्णांची संख्या ६९१ वर जावून पोहोचली आहे. महाराष्ट्रात देशातील सर्वात जास्त म्हणजे १४२ रुग्ण आढळून आले आहेत. तर, १७ लोकांचा या आजारामुळे मृत्यू झालाय. गेल्या २४ तासात ७५ नवीन रुग्णांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीये.

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, आत्तापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मधुमेह, उच्च रक्तदाब असे आजार होते.

केंद्र सरकारने कोविड-१९ विरोधातील लढ्याविरोधात सज्ज राहण्यासाठी फ्रन्ट लाईन आरोग्य कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यास सुरूवात केलीये. तसंच, एम्सच्या डॉक्टरांच्या मदतीने देशभरातील डॉक्टरांचं ट्रेनिंग सुरू झालं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे लव अग्रवाल म्हणाले, "शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व राज्यांचे राज्यपाल आणि उपराज्यपालांशी चर्चा केली आहे. सद्य स्थितीत मोठ्या प्रमाणावर मजूर आपल्या गावांकडे चालत निघाले आहेत. याबाबत केंद्रीय गृहसचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहीलंय. या मजूरांसाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत".

"एम-९५ मास्क आणि, डॉक्टरांसाठी कोरोना वॉर्डमध्ये वापरण्यासाठी प्रोटेक्टिव्ह किट्सबाबत सरकार योग्य उपाययोजना करतंय. यात काही अडचणी आहेत, ज्यावर मात करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करतंय. आम्ही भारतीय उत्पादकांसोबत काम करतोय. याचा नक्की फायदा होईल. आम्ही, प्रत्येक राज्यासोबत त्यांची मागणी आणि गरज याबाबत चर्चा करतोय", असंही लव अग्रवाल म्हणाले.

तर, इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे संसर्ग विभागाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले, "भारतात अजूनही कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही. कोविड-१९च्या चाचणीसाठी इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चही भारतीय बनावटीचं तंत्रज्ञान विकसीत करण्याचा प्रयत्न करतंय. आमच्याकडे तंत्रज्ञान विकसीत झालं तर, आम्ही सरकारसोबत काम करू. फक्त, चीन नाही, आम्ही इतर देशांकडूनही टेस्ट किट मिळवण्याचा प्रयत्न करतोय."

केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने लॉकडाऊनच्या काळात डॉक्टरांना टेलि-मेडिसीनची परवानगी दिलीये. त्यामुळे जनतेने याचा फायदा घ्यावा असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलीये.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top