Friday, 27 Mar, 5.17 pm माय मेडिकल मंत्रा

होम
#CoronaVirus: इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

  • इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण
  • जॉन्सन यांनी ट्विटरवर दिली माहिती
  • बोरिस जॉन्सन यांनी स्वतला केलं होम क्वॉरेन्टाईन
  • कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याची माहिती

जगभरात कोविड-१९ ने ग्रस्त लोकांची संख्या वाढत असताना. इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. याबाबत स्वत बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट केलं आहे.

मी घरीच होम क्वॉरेन्टाईन करून घेतलं आहे. मात्र, व्हिडीओ कॉन्फ्रेसिंगच्या मदतीने सरकारचं कामकाज करत असल्याची माहिती त्यांनी दिलीये.

प्रिन्स चार्ल्स यांना काही दिवसांपुर्वी कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं.

चीनमधून सुरू झालेल्या कोरोना वायरसचा संसर्ग आता जगभरातल्या 195 देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरात सुमारे 3 लाख 75 हजार लोकांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून मृतांचा आकडा 16 हजारपेक्षा जास्त आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top