Friday, 27 Mar, 12.50 pm माय मेडिकल मंत्रा

होम
#CoronaVirus: खाजगी डॉक्टरांनी रूग्णालयं सुरु ठेवावीत- आरोग्यमंत्री

राज्यात कोरोना व्हायरसच्या रूग्णांंचा आकडा वाढत जातोय. सध्या कोरोना रूग्णांचा संख्या 135 पर्यंत पोहोचली आहे. मात्र कोरोनाची लागण झालेल्या एकूण 15 रूग्णांना बरं करून घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करू नये असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खाजही डॉक्टरांना केलं आहे.

पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री म्हणाले, "खाजगी डॉक्टरांनी आपली रूग्णालयं तसंच दवाखाने सुरू ठेवावेत. कोरोना बाजूला ठेवावा, त्याव्यतिरिक्त आणखीही आजार आहेत. अशा आपात्कालिन परिस्थितीत रूग्णाला जर मदत हवी असेल तर तो कुठे जाणार? त्यामुळे डॉक्टरांनी भितीपोटी क्लिनीक आणि रूग्णालयं बंद करू नयेत."

आरोग्यमंत्री पुढे म्हणाले, "राज्यात रक्ताचा तुडवडा आहे. पुढील आठवडाभर पुरेल इतकाच राज्यात रक्तसाठा आहे. रक्ताला कोणताही पर्याय नाहीये. तसंच रक्त जास्त काळ साठवूनही ठेवता येत नाही. त्याची मर्यादा केवळ 35 दिवस असते. अनेक उपचारांसाठी रक्ताची आवश्यकता भासते. रक्तदानासाठी डोनेशनसाठी आपण कॅम्प आयोजित केले पाहिजेत."

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top