Friday, 27 Mar, 7.34 pm माय मेडिकल मंत्रा

होम
#CoronaVirus: कॉरंटीनचा स्टॅम्प असलेला व्यक्ती बसमध्ये चढतो तेव्हा.

"वेळ सकाळची.बस परेलहून दादरला निघाली..लॉकडाऊन असल्यामुळे बसमध्ये जास्त प्रवासी नव्हते. मी बसमध्ये चढले.बस काही अंतर पुढे गेली आणि बसमध्ये बसलेल्या एका व्यक्तीवर कंडक्टरची नजर खिळली.कारण त्या व्यक्तीच्या हातावर होता कॉरंटीनचा स्टॅम्प. त्या स्टॅम्पला पाहून कंडक्टर थोडा चिंतेत सापडला आणि.."

डॉ. मोनाली चोडपे, वैद्यकीय अधिकारी, मुंबई महानगरपालिका

परदेशातून भारतात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हातावर कॉरंटीनचा स्टॅम्प मारला जातोय. या व्यक्तींना १४ दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला आहे. मात्र तरीही काही लोकं सरकारचे आदेश न पाळता घराबाहेर पडतात.

डॉ. मोनाली यांनी सांगितलं "हातावरील स्टॅम्प पाहून, काका तुम्ही का बाहेर पडलात, घरीच थांबायचं ना असा प्रश्न कंडक्टरने केला. तितक्यात कॉरंटीनचा स्टॅम्प असेलला व्यक्ती आपल्या बसमध्ये आहे हे कळल्यावर लोकं एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर कोरोनाची भिती स्पष्ट दिसत होती. बसमध्ये एकच गोंधळ झाला."

अशा परिस्थितीत शेवटी डॉ. मोनाली यांनी कंडक्टरला शांत केलं आणि सॅनिटाझर दिलं. कंडक्टरने त्या प्रवाशाला खाली उतरवलं आणि कंट्रोल रूमला माहिती दिली. त्यानंतर डॉ. मोनाली यांनी जागेवर कुणाला बसू देवू नका असं कंडक्टरला सांगितलं.

मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. मोनाली चोपडे यांनी हा अनुभवलेला प्रसंग. कॉरंटीनचा स्टॅम्प असलेला एखादा व्यक्ती बसमध्ये चढतो काय आणि त्यावेळी लोकांची घाबरगुंडी उडते.

डॉ. मोनाली माय मेडिकल मंत्राशी बोलताना म्हणाल्या, "की अशा प्रसंगात पॅनिक होण्यापेक्षा लोकांनी परिस्थितीच गांभीर्य ओळखळं पाहिजे. प्रशासमाकडून बाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातोय तो लोकांनी पाळला पाहिजे. कॉरंटीनचा स्टॅम्प असलेल्या लोकांनी बाहेर पडूच नये. त्याशिवाय इतर नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे. आणि हेच नागरिकांचं कर्तव्य आहे."

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top