Friday, 27 Mar, 11.35 am माय मेडिकल मंत्रा

होम
#CoronaVirus: मुंबईत कोरोनाग्रस्तांसाठी ६०० बेड्सची व्यवस्था

मुंबईप्रमाणे पुणे येथेही स्वतंत्र सातशे खाटांच्या करोना रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे यापैकी 100 खाटा आयसीयू साठी असतील अशी माहितीही अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र सरकार सज्ज झालंय. कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते हे लक्षात घेवून सरकारने मुंबईच्या जे जे समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालयात 300 बेड्सची स्वतंत्र व्यवस्था आणि 60 बेड्सचा आयसीयू विभाग तयार करण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचप्रमाणे जीटी रुग्णालयात 250 खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि 50 खाटांच्या आयसीयू विभागाची व्यवस्था करण्यात येत आहे. ही दोन्ही रुग्णालये लवकरच सुरू होत आहेत.

जे.जे. समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी.टी.रुग्णालय येथे करोना ग्रस्तांसाठी उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांचे आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी सनदी अधिकारी विनिता सिंगल यांची नेमणूक करण्यात करण्यात आली आहे अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी मुंबईत दिली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top