Saturday, 28 Mar, 12.19 pm माय मेडिकल मंत्रा

होम
#CoronaVirus: पोलिसांवर ताण देऊ नका- जयंत पाटील

राज्यात 6 नवीन कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसंच घरातच थांबा, करोनाला रोखा असं आवाहनंही करण्यात आलं आहे. त्यातच घराबाहेर पडणाऱ्या किती लोकांना पोलीस थांबवणार? असा सवाल करत आपण स्वत: शिस्त पाळून सरकारला सहकार्य करावं, अशी विनंती मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे.

जयंत पाटील यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी शनिवारी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "सध्याच्या परिस्थितीत कोणीही घराबाहेर पडू नये. आपणच खबरदारी घ्यायला हवी आणि घरातच थांबायला हवं. आपल्याला काही होणार नाही असा समज ठेऊन कोणीही घराबाहेर बाहेर पडू नये. बाहेर पडलेल्या किती जणांना पोलीस थांबावणार. तो देखील एक माणूस आहे. त्यामुळे आपणच घराबाहेर न पडणं योग्य आहे."

"करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील गोरगरीब जनता उपाशी राहू नये यासाठी आम्ही शिवभोजनाची संख्या वाढवली आहे.काही ठिकाणी सोशल डिस्टंस ठेवण्यासाठी बाजारांमध्ये चौकोन आखून देण्यात आसे आहेत. गर्दी होऊ नये यासाठी आम्ही काम करत असल्याचंही," जयंत पाटील यांनी सांगितलं.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top