Friday, 27 Mar, 4.13 pm माय मेडिकल मंत्रा

होम
#CoronaVirus: सांगलीत आढळले 12 नवीन रूग्ण

राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढतेय. सांगलीमध्ये कोरोनाचे नवीन 12 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही 147 वर पोहचली आहे. संपूर्ण देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

सर्वजण घरी असताना जनतेच्या सोयीसाठी राज्यातील हॉटेलांना त्यांचं किचन सुरु ठेवून खाद्यपदार्थ घरपोच किंवा सोसायट्यांपर्यंत पोहचवण्यास परवानगी देण्यात आलीये. मात्र खाद्यपदार्थ बनवणाऱ्या व पोहचवणाऱ्या व्यक्तींनी स्वच्छता आणि 'कोरोना' सुरक्षिततेची योग्य काळजी घेणं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "राज्यात अंडी, कोंबडी, मटण, गोड्या व खाऱ्या पाण्यातील मासळीची विक्री खुली असून त्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे नागरिकांना हे पदार्थ खरेदी करता येतील. कोकणातील आंबे, नाशिकची द्राक्षं, नागपूरची संत्री, केळी, कलिंगड अशी सर्वप्रकारची फळे बाजारात विकता येणार आहेत. मात्र, विक्री आणि खरेदी करणाऱ्या दोघांनीही, 'कोरोना'संदर्भात आवश्यक स्वच्छता, सुरक्षितता बाळगायची आहे, गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळून खरेदी करायची आहे."

"दूध, भाजीपाला, फळांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा करण्यात कोणताही अडथळा नाही. साखर कारखान्यात गाळपासाठी ऊस आणण्यास परवानगी आहे. मात्र उसतोड मजूरांच्या जेवणाची काळजी संबंधीत कारखान्यांना घ्यावी लागणार आहे. राज्य सरकाने लष्कराच्या मदतीसाठी लिहिलेले पत्र हे केवळ लष्कराची वैद्यकीय मदत मिळण्यापुरतं मर्यादित आहे" असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top