Friday, 27 Mar, 9.10 pm माय मेडिकल मंत्रा


#CoronaVirus: शिक्त पाळा, मुख्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झालीये. राज्यात १५३ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत. शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. कोरोनाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या खबरदारीच्या उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.

याबैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी फेसबूकच्या माध्यमातून संवाद साधवा.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादातील महत्त्वाचे मुद्दे

रस्त्यावरची गर्दी कमी झालीये. पण, काही ठिकाणी कारण नसताना झुंबड झालेली पहायला मिळाली. गर्दी होवू नये म्हणून दुकानं २४ तास उघडी ठेवण्याचा निर्णय धाडसी आहे. अजुनही काही ठिकाणी शिस्त पाळली जात नाही. त्यामुळे सर्वांनी घरी रहावं. या संकटाच्या मागे हात धूवून लागायचं आहे.

दिल्लीतून हजारो लोकं आपल्या घरी उत्तरप्रदेश आणि बिहारकडे चालत निघाले आहेत. मोठ्या संख्येने लोकं स्थलांतर करतायत. महाराष्ट्रात राहणाऱ्या परराज्यातील लोकांबाबत अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केले होते. या लोकांना आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,

इतर राज्यातील लोकं घरी चालले आहेत. मी विनंती करतो, जिथे आहात तिथे थांबा. तुमची जबाबदारी सरकारची आहे. घराबाहेर जाण्याचा प्रयत्न करू नका. या लोकांना मदतीसाठी काही स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. ज्या स्वयंसेवी संस्था या लोकांची मदत करण्यास तयार असतील त्यांना मदत करावी.

आपण व्हायरसच्या महत्त्वाच्या टप्प्यात पोहोचलो आहे. रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहेत. पण, दुसरीकडे काही रुग्ण पूर्ण बरे होवून घरी जावू लागलेत. त्यामुळे लक्षणं दिसल्यानंतर ताबडतोप उपचार महत्त्वाचे आहेत. मी खासगी डॉक्टरांना विनंती करतो, तुमचा दवाखाना बंद करून नका. काळजी घ्या, पण लोकांना तपासा.

राज्यात काही ठिकाणी लॉकडाऊन असताना पोलिसांसोबत लोकांनी हुज्जत घातल्याच्या घटना समोर आल्या. लोकांना आवाहन करताना मुख्यमंत्री म्हणाले,

पोलिसांवर मोठी जबाबदारी आहे. हे सर्व आपल्यासाठी अहोरात्र मेहनत करतायत. त्याच्या घरीदेखील मुलं आहेत. त्यांच्यावर किती दबाव टाकावा. किती त्रास द्यायचा त्यांना. हे योग्य नाही.

कोविड-१९ च्या विरोधात मैदानात उतरलेले डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांचे उपकार कसे मानावे कळत नाहीये. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आरोग्यसेवा देणाऱ्यांचं कौतूक केलं.

घरात बसून कंटाळा आला असेल. लोकांना काम करण्याची सवय असते. मात्र, हा काळ फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे घरातील वातावरण पॉझिटिव्ह ठेवा. संकट घराबाहेर आहे. घरात येण्यापासून त्याला रोकायचं आहेथा

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top