Wednesday, 11 Sep, 10.53 am माय मेडिकल मंत्रा

होम
जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती

जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. पल्लवी सापळे यांची नियुक्ती झाली आहे. सर जे.जे रुग्णालय समुहाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची पुण्यातील ससून रुग्णालयात आणि बी जे मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता पदी बदली करण्यात आली आहे.

डॉ. अजय चंदनवाले यांनी डिसेंबर 2018 मध्ये मुंबईतील जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्विकारला होता. डॉ. अजय चंदनवाले यांनी आपल्या कारकिर्दीत जे. जे. रुग्णालयात आमूलाग्र बदल केले, रुग्णहिताचे अनेक निर्णय घेतले. रुग्णांच्या मदतीसाठी सामाजिक दायित्व निधी उपक्रम सुरू केला.

डॉ. अजय चंदनवाले यांच्यानंतर डॉ. पल्लवी सापळे या जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा भार स्वीकारतील. त्या सांगलीतील मिरज सरकारी वैद्यकीय विद्यापिठाच्या अधिष्ठाता होत्या. सांगलीत पुरानं हाहाकार माजवल्यानंतर डॉ. पल्लवी सापळे यांनी मोठं मदतकार्य केलं होतं. पूरग्रस्तांना तातडीनं उपचार उपलब्ध करून दिलं. पूरग्रस्तांसाठी आरोग्य शिबिरं राबवली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top
// // // // $find_pos = strpos(SERVER_PROTOCOL, "https"); $comUrlSeg = ($find_pos !== false ? "s" : ""); ?>