Monday, 24 Feb, 11.29 pm माय मेडिकल मंत्रा


कोरोना व्हायरस- महाराष्ट्रात २ जण देखरेखीखाली

कोरोना वायरससंदर्भात सध्या राज्यात दोन जण निरीक्षणाखाली आहेत. याशिवाय आतापर्यंत 83 प्रवाशांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आतापर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 50 हजार 91 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, दक्षिण कोरिया, जपान यासोबत नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया या देशातील प्रवाशांची तपासणीही विमानतळावर करण्यात येतेय.

बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येतोय. सोमवारपर्यंत राज्यात बाधित भागातून 294 प्रवासी आलेत. त्यापैकी 216 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात 85 जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी 84 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. 85 प्रवाशांपैकी 83 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. सध्या मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी 1-1 जण भरती आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top