Friday, 14 Feb, 10.05 pm माय मेडिकल मंत्रा


कोरोना व्हायरस- राज्यात सर्व जिल्हा व सरकारी रुग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना

14 फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 31,934 प्रवासी तपासण्यात आले आहेत. बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात बाधित भागातून 186 प्रवासी आले आहेत.

नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालयं तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. राज्यात 39 विलगीकरण कक्षांमध्ये 361 खाटा उपलब्ध आहेत. सध्या राज्यात चार जण निरीक्षणाखाली असून प्रत्येकी २ जण मुंबई आणि पुण्यात भरती असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

आरोग्यमंत्री पुढे म्हणाले, "18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात शुक्रवारी 48 जणांना भरती करण्यात आले आहे. भरती करण्यात आलेल्यापैकी 47 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा पुण्यातील एन आय व्ही कडून देण्यात आला आहे. एका प्रवाशाचा प्रयोगशाळा अहवाल शनिवारपर्यंत प्राप्त होईल."

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार वुहान शहरातून येणा-या सर्व प्रवाशांना भरती करण्याचे आणि त्यांचे प्रयोगशाळा निदान करण्याचे धोरण राज्यात राबवण्यात येत आहे. इतर बाधित भागातून येणा-या प्रवाशांचा पाठपुरावा 14 दिवसांकरता करण्यात येतो आहे. बाधित भागातून राज्यात आलेल्या एकूण 186 प्रवाशांपैकी 125 प्रवाशांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे.

मुंबई, पुणे, ठाणे यासह नांदेड, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अहमदनगर, अमरावती, पालघर,जळगाव,चंद्रपूर, सातारा या जिल्ह्यातूनही चीन आणि इतर बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top