Monday, 12 Aug, 8.05 am माय मेडिकल मंत्रा

होम
#MaharashtraFloods: वैद्यकीय सेवा पूरग्रस्तांच्या दारोदारी पोहोचवणार- गिरीष महाजन

सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापूराने भयावह परिस्थिती निर्माण केली. पूराचा मोठा फटका बसलेला सांगली आणि कोल्हापूर या भागात सरकार आता कोणती पावलं उचलणार आहे शिवाय सरकारकडून नागरिकांना कोणती मदत करण्यात येणार आहे याबाबत माय मेडिकल मंत्राने गिरीष महाजन यांच्याशी एक्स्लुसिव्ह चर्चा केली आहे. यावेळी वैद्यकीय सेवा पूरग्रस्तांच्या दारोदारी पोहोचवणार असल्याचं महाजन यांनी सांगितलंय.

सांगली आणि कोल्हापूरमध्ये आलेल्या महापूराने भयावह परिस्थिती निर्माण केली. मात्र आता पूराचं पाणी ओसरताना दिसतंय. त्यामुळे आता लोकांना रेस्क्यू करण्यासोबतच सरकार आता लोकांचं पुनर्वसन करण्यावर भर देत असल्याचं वैद्यकीय शिक्षणमंत्री आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी माय मेडिकल मंत्राला सांगितलं आहे.

पूराचा मोठा फटका बसलेला सांगली आणि कोल्हापूर या भागात सरकार आता कोणती पावलं उचलणार आहे शिवाय सरकारकडून नागरिकांना कोणती मदत करण्यात येणार आहे याबाबत माय मेडिकल मंत्राने गिरीष महाजन यांच्याशी एक्स्लुसिव्ह चर्चा केली आहे.

गिरीष महाजन यांच्या सांगण्यानुसार, महापूराचा फटका बसलेल्या व्यक्तींच्या समस्या आणि मागण्या जाणून घेण्यासाठी डोर-टू-डोर मोहीम राबवण्यात येणार आहे. याशिवाय सरकारी मेडिकल कॉलेजमधील आणि स्थानिक 300 डॉक्टर रूग्णांना उपचार देत आहेत.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना गिरीष महाजन म्हणाले, "लवकरच डोर-टू-डोर मोहीम म्हणजे दारोदारी जाऊन लोकांना समस्या आणि मागण्या जाणून घेण्यासाठी मोहीम राबवण्यात येणार आहे. लोकांना कोणत्या भीषण गोष्टींना सामोरं जावं लागतंय हे पाहण्यात येईल. आम्ही आमच्याकडून मदत करण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय खाजगी आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर, सार्वजनिक रूग्णालयातील डॉक्टर रूग्णांवर उपचार करण्यासाठी भरपूर मेहनत घेतायत."

कोल्हापूर आणि सांगली भागात सध्या आरोग्यसुविधा हे खूप मोठं आव्हान आहे. या आव्हानांना कशा पद्धतीने हाताळता येईल याबाबत स्पेशल प्लॅन अंमलात आणला जाईल असंही मंत्र्यांनी सांगितलंय. याशिवाय मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये गरजूंसाठी स्वतः पुढाकार घेऊन मदत करण्याचं आवाहनंही महाजन यांनी केलंय.

गिरीष महाजन पुढे म्हणाले, "साफसफाई करण्याचं सामान आमच्याकडून पुरवण्यात येतंय. याशिवाय पाण्याला पिण्यायोग्य स्वच्छ करणारं केमिकल देखील नागरिकांना देण्यात येत आहे. याचसोबत ब्लॅंकेट्स, सॅनिटरी नॅपकिन्स, औषधं, मेडिसीन या मूलभूत गोष्टी देखील देण्यात येत आहेत. रिलीफ कॅम्पमध्ये या सगळ्या सुविधा देण्यात आल्या आहेत. आरोग्य सुविधांच्या प्रश्नांबाबत मिरज मेडिकल कॉलेज आणि सांगली जिल्हा रूग्णालयातील कर्मचाऱ्यांद्वारे काम सुरु आहेत. यासाठी आम्ही खास आपात्कालीन व्यवस्थापन सेल स्थापन केला आहे."

गिरीष महाजन यांच्या माहितीनुसार, घरांमधून आणि दुकानातून पाणी बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. राज्यातील अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन मदत केली आहे. सरकारी डॉक्टरांकडून पूराचा फटका बसलेल्या पिडीतांना मानसिक आधार दिला जातोय.

महाजन म्हणाले, "आरोग्यसुविधा देणं ही खूप मोठं आव्हान आहे. तरीही गरजूंना मोफत उपचार दिले जातील."

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top