Friday, 13 Sep, 12.05 pm माय मेडिकल मंत्रा

होम
माजी विद्यार्थीनी बनली जे.जे रुग्णालयाची नवी अधिष्ठाता

1995 साली MBBS पूर्ण केल्यानंतर, डॉ. पल्लवी यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. 1998 ते 2010 या कालावधीत त्या सर जे.जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आणि ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक होत्या.

राज्यातील सर्वात मोठं वैद्यकीय महाविद्यालय, सर जे.जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या अधिष्ठाता म्हणून, डॉ. पल्लवी सापळे यांनी शुक्रवारी पदभार स्विकारला. वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी डॉ. सापळे यांची अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले होते.

डॉ. पल्लवी सापळे यांचा वैद्यकीय विश्वातील प्रवास सुरू झाला 1990 साली. 1990 मध्ये पल्लवी सापळे नावाची विद्यार्थीनी देशातील नावाजलेल्या सर जे.जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आणि ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये आली. 1990 ते 1995 दरम्यान पल्लवी सापळे यांनी MBBS पूर्ण करून 'डॉक्टर' ही पदवी मिळवली. त्यानंतर, 1995 ते 1998 त्यांनी ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्यूएट पूर्ण केलं.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या, "माझ्यासाठी हा आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे. मला आज खूप आनंद होतोय. ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी गोष्ट आहे, आणि कायम माझ्यासोबत राहील. वैद्यकीय शिक्षण विभागाने माझ्यावर विश्वास दाखवून मला अधिष्ठाता केलं. हा विश्वास सार्थकी लावण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.".

1995 साली MBBS पूर्ण केल्यानंतर, डॉ. पल्लवी यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. 1998 ते 2010 या कालावधीत त्या सर जे.जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आणि ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक होत्या. त्यानंतर, प्राध्यापक म्हणून 2010 ते 2014 बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई मेडिकल कॉलेज आणि त्यानंतर 2014-2016 त्यांनी जे.जे मध्ये सेवा केली.

"मला 29 वर्षांपूर्वीचे दिवस आठवतायत. तेव्हा मी एक सामान्य विद्यार्थीनी म्हणून या भव्य वास्तूत पाय ठेवला होता. आता, माझ्यावर या संस्थेची अधिष्ठाता म्हणून धुरा सांभाळण्याची जबाबदारी आहे. जे.जे रुग्णालय आणि ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजने मला सर्वकाही दिलं आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाची वर्ष मी या वास्तूत जगले आहे" असं डॉ. सापळे म्हणाल्या.

शुक्रवारी अधिष्ठाता पदाचा पदभार स्विकारल्यानंतर, डॉ. सापळे यांना जे.जे रुग्णालयात आया म्हणून काम करणाऱ्या विद्या पुजारी, ज्यांची जे.जे रुग्णालयात सखू मावशी म्हणून ओळख आहे, त्या आवर्जून भेटायला आल्या होत्या.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना सखू मावशी म्हणाल्या, "मला आज खूप आनंद होत आहे. याच कॉलेजमधली एक विद्यार्थीनी अधीष्ठाता म्हणून जे.जे रुग्णालयात परत आलीये."

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top