Thursday, 11 Jul, 3.13 pm माय मेडिकल मंत्रा

होम
मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने SEBC अंतर्गत आरक्षण लागू करण्याला विरोध करणारी याचिका फेटाळली.

  • मराठा समाजातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिलासा
  • मुंबई उच्च न्यायालयाने SEBC अंतर्गत आरक्षण लागू करण्याला विरोध करणारी याचिका फेटाळली

एमबीबीएसचं शिक्षण घेणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. SEBC अंतर्गत आरक्षण लागू करण्याला विरोध करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल कऱण्यात आली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

मराठा समाजातील लोकांना शिक्षण आणि नोकरीमध्ये 16 टक्के आरक्षण देण्यात यावं यासाठी राज्य सरकारने अध्यादेश जारी केला होता. या अध्यादेशाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

न्यायाधीश एस.सी धर्माधिकारी आणि न्यायाधीश गौतम पटेल यांच्या खंडपीठाने दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेत याचिका फेटाळून लावली आहे.

यावेळी राज्य सरकारच्या सांगण्यानुसार, प्रवेश प्रक्रीया जरी आधी सुरू झाली असली तरी आरक्षण हे प्रवेश देतानाच लागू केलं होतं.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना वकील राजेश टेकाळे म्हणाले, "SEBC अंतर्गत आरक्षण लागू करण्याला विरोध करणारी याचिका फेटाळली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने यावर अध्यादेश काढला होता. हा अध्यादेश फक्त वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी नसून इतर शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांसाठी देखील आहे असं कोर्टाने यावेळी सांगितलं."

यासंदर्भात बोलताना मराठा समाजातील पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉ. शिवाजी भोसले यांंच्या सांगण्यानुसार, "उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मोठा मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने कोणतेही विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात कोणतेही निर्णय देताना ती प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी द्यावी. जेणेकरून अधिक गोंधळ होणार नाही."

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top