Tuesday, 23 Apr, 9.45 am माय मेडिकल मंत्रा

होम
MBBS डॉक्टरांना IAS बनण्यासाठी ब्रीजकोर्स हवा, डॉक्टरचं पंतप्रधानांना पत्र

गुरगाव मधील एका डॉक्टरने एमबीबीएस डॉक्टरांना आयएएस बनण्यासाठी ब्रीजकोर्स असावा अशी मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय.

डेंटिस्ट डॉक्टरांना फॅमिली फिजीशयनची प्रॅक्टिस करण्यासाठी सरकार ब्रीजकोर्स आणण्याचा विचार करतंय. मात्र हा ब्रीज कोर्स सरकार आणि डॉक्टर यांच्यातील एक वादाचा मुद्दा बनलाय. मात्र आता गुरगाव मधील एका डॉक्टरने एमबीबीएस डॉक्टरांना आयएएस बनण्यासाठी ब्रीजकोर्स असावा अशी मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय.

गुरगावमधील पल्मनरी मेडिसीनचे डॉ. रितेश शर्मा यांनी 21 एप्रिल रोजी पंतप्रधानांना पत्र लिहून एमबीबीएम डॉक्टरांना आयएएस बनण्यासाठी एक ब्रीजकोर्स असावा अशी मागणी केलीये. यासाठी डॉ. शर्मा यांनी मोहीम देखील सुरु केलीये.

डॉ. शर्मा यांनी पत्रात नमूद केल्यानुसार,

  • एमबीबीएस आणि पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांना ब्रीजकोर्सद्वारे अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रेनिंग मिळावी.
  • जेणेकरून या माध्यमातून हे डॉक्टर आयएएस बनतील आणि याचा फायदा भारतात चांगल्या पद्धतीने आरोग्यसेवेचं व्यवस्थापन होईल.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना हरियाणातील पल्मनरी मेडिसीनचे एमडी डॉ. रितेश शर्मा म्हणाले, "आपल्या देशात अजूनही अनेक ठिकाणी आरोग्यसुविधा पोहोचत नाहीत. यासाठी प्रशासनाने पुढाकार घेणं फार आवश्यक आहे. जर प्रशासनात एखादा एखादा आयएएस ऑफीसर डॉक्टर असेल तर ज्या ठिकाणी आरोग्यसुविधा मिळत नाहीत अशा ठिकाणी त्या मिळण्यास मदत होईल."

डॉ.शर्मा पुढे म्हणाले, "नवीन आजार किंवा आरोग्यक्षेत्राची अधिक माहिती ही एखाद्या डॉक्टरला चांगल्या पद्धतीने कळू शकते. त्यामुळे त्याविषयी कोणती धोरणं बनवायची हा निर्णय डॉक्टर योग्यरित्या घेऊ शकतो. याचसाठी मी एमबीबीएम डॉक्टरांना आयएएस बनण्यासाठी एखादा ब्रीजकोर्स असावा या आशयाचा पंतप्रधानांना पत्र लिहिलंय."

डेंटिस्ट डॉक्टरांना फॅमिली फिजीशयनची प्रॅक्टिस करण्यासाठीच्या ब्रीजकोर्सला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केलाय. आणि जर सरकारने हा ब्रीजकोर्स लादला तर तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा देण्यात आलाय.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top