Thursday, 13 Feb, 7.27 pm माय मेडिकल मंत्रा

होम
.म्हणून मधुमेहींनी सकाळी दूध प्यावं!

सकाळी नाश्त्याच्यावेळी दूध प्यायल्याने मधुमेही रूग्णांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. असं एका संशोधनाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलंय.

ए चल पटापट ग्लासातलं दूध संपव.शाळेत जाण्यापूर्वी मुलांचा हा नित्यनियमाचा कार्यक्रम ठरलेला असतो. काहींना दूधाचं नाव जरी काढलं तरी तोंड वाकडं होतं. मात्र सकाळी नाश्त्याला दूध पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.

कॅनडामधील टोरंटो विद्यापीठातील आणि गिलेफ विद्यापीठातील संशोधकांच्या सांगण्यानुसार, सकाळी नाश्त्याच्यावेळी दूध प्यायल्याने मधुमेही रूग्णांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं. त्यामुळे मधुमेही रूग्णांनी सकाळी नाश्त्याच्या वेळी थोडेफार बदल केल्यास मधुमेही रूग्णांना अनेक फायदे होतील.

संशोधकांच्या सांगण्यानुसार, सकाळी नाश्ता करताना दूध प्यायल्याने जेवनानंतर रक्तात होणाऱ्या शर्करेतील वाढ कमी होते. त्याचप्रमाणे दिवसभर लागणाऱ्या भूकेचंही प्रमाण कमी होतं.

गिलेफ विद्यापीठातील डगलस गोफ यांच्या सांगण्यानुसार, जगभरात चयापचय संबंधीत समस्यांचं प्रमाण वाढतंय. लठ्ठपणा आणि मधुमेह या आरोग्याच्या मुख्य समस्या आहेत. त्यामुळे व्यक्तींनी आरोग्य सुधारण्यासाठी आणि मधुमेह, लठ्ठपणा या समस्येवर उपाय म्हणून आहाराकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे.

संशोधकांनी सकाळी नाश्त्यासोबत प्रथिनांचं प्रमाण वाढवल्यानंतर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी दुधातील प्रथिनांचं प्रमाण वाढवलं. याचा रक्तातील साखरेवर आणि दिवसभरातील आहारावर नेमका काय परिणाम होतो याचं संशोधन केलं.

यावेळी अभ्यासकांच्या असं लक्षात आलं की, दुधामध्ये असणाऱ्या प्रथिनांमुळे चयापचयाची क्रियेचा वेग मंदावतो आणि पोट भरल्यासारखं वाटतं. दुधामध्ये असणाऱ्या प्रथिनांमुळे हे परिणाम लवकर दिसून येतं.

संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, दुधामध्ये व्हे नावाचं प्रथिनं असतं. या प्रथिनांचं सेवन केल्यानंतर दुपारच्या जेवणात मोठय़ा प्रमाणात बदल झाल्याचं त्यांना आढळून आलं नाही. पण कार्बोहायड्रेट अधिक असणाऱ्या आहारासोबत सकाळी दूध प्यायल्याने दुपारच्या जेवणानंतरही रक्तातील शर्करेच्या पातळीत घट दिसून आली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top