Wednesday, 18 Sep, 9.37 am माय मेडिकल मंत्रा

होम
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'माय मेडिकल मंत्रा'च्या 'हेल्दी महाराष्ट्र' कॉफी टेबल बुकचं अनावरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नाशिकमध्ये 'माय मेडिकल मंत्रा' या आरोग्य विषयक बातम्या देणाऱ्या वेबसाईटच्या 'हेल्दी महाराष्ट्र' या कॉफी टेबल बुकचं अनावरण केलं. आरोग्यदायी महाराष्ट्र घडवण्यासाठी आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल गरजेचे आहेत. महाराष्ट्र आरोग्यसंपन्न होण्यासाठी सरकारतर्फे कोणते प्रयत्न होणं गरजेचं आहे, हे 'माय मेडिकल मंत्रा'ने या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी नाशिकमध्ये 'माय मेडिकल मंत्रा' या आरोग्य विषयक बातम्या देणाऱ्या वेबसाईटच्या 'हेल्दी महाराष्ट्र' या कॉफी टेबल बुकचं अनावरण केलं. या कार्यक्रमाला राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यसभा खासदार भुपेंद्र यादव, माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते.

महाराष्ट्र आजारमुक्त करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नीती आयोगाच्या 'हेल्थ इन्डेक्स'मध्ये राज्याने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. असं असलं तरी आरोग्यदायी महाराष्ट्र घडवण्यासाठी आरोग्य व्यवस्थेत आमूलाग्र बदल गरजेचे आहेत.

आरोग्यसेवा सुधारली तर महाराष्ट्र आरोग्यसंपन्न होण्याच्या दिशेने वाटचाल करेल. या दृष्टीने सरकारतर्फे कोणते प्रयत्न होणं गरजेचं आहे, हे 'माय मेडिकल मंत्रा'ने या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील आरोग्यसंपन्न महाराष्ट्राचं चित्र, चांगले डॉक्टर घडवण्यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचं व्हिजन आणि सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्यासाठी आरोग्य खात्याने केलेल्या उपाययोजना या कॉफी टेबल बुकमध्ये मांडण्यात आल्यात.

'हेल्दी महाराष्ट्र' कॉफी टेबल बुकचं अनावरण करताना मुख्यमंत्री म्हणाले, " माय मेडिकल मंत्राने एक चांगला पुढाकार घेतला आहे. याद्वारे राज्यात आरोग्यविषयक धोरणं तयार करण्यासाठी मदत होईल. "

तर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन म्हणाले, " आजारमुक्त महाराष्ट्र तयार करणं हे आमचं ध्येय आहे. हेल्दी महाराष्ट्र हे कॉफी टेबल बुक आरोग्यविषयक धोरणं मजबूत करण्यासाठी नक्कीच मदत करेल. "

महाराष्ट्रातील ४० पेक्षा अधिक नामांकित डॉक्टरांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राचं हेल्थ व्हिजन सरकारसमोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. या कॉफी टेबल बुकमध्ये पद्मश्री विजेते डॉ. अभय बंग, डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. अमित मायदेव, डॉ. तात्याराव लहाने यांच्यासारख्या नामांकित डॉक्टरांनी आरोग्यसंपन्न महाराष्ट्राचं त्यांचं व्हिजन मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

ग्रामीण, दुर्गम आदिवासी भागात वैद्यकीय सेवा पोहोचली तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हेल्दी होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. २१ व्या शतकातील बदललेली जीवनशैली, जंक-फूडचा लहान मुलांवर होणारा वाढता प्रभाव, रुग्णांचा डॉक्टरांवरील कमी होत असलेला विश्वास, ग्रामीण भागातील आरोग्यव्यवस्था अशा अनेक विषयांवर तज्ज्ञांनी आपलं मत मांडलं आहे.

सरकारी स्तरावर आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जातात. या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून नामांकित डॉक्टरांची मतं आणि त्यांनी सूचवलेल्या उपाययोजना सरकारी अधिकाऱ्यांना आरोग्य धोरण बनवताना नक्कीच कामी येतील.

राज्यातील डॉक्टर खासदारांनी सरकारी धोरण, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध होणारी आरोग्य व्यवस्था या मुद्द्यांना अधोरेखित केलं आहे.

अवयवदान, आरोग्य शिक्षण, ग्रामीण भागातील मातांचं आरोग्य या विषयांवर डॉक्टरांची मतं या कॉफी टेबल बुकमध्ये वाचायला मिळणार आहेत.

संदीप जाधव, रामेश्वर नाईक आणि भूषण चिंचोळे यांच्यासह माय मेडिकल मंत्राचे संपादक संतोष आंधळे, सहसंपादक मयांक भागवत यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top