Tuesday, 17 Sep, 7.37 am माय मेडिकल मंत्रा

होम
मुंबईकर आरोग्यावर किती खर्च करतात?

'द स्टेट ऑफ हेल्थ इन मुंबई' हा मुंबईच्या आरोग्य स्थितीवर वार्षिक अहवाल प्रसिद्ध सादर करण्यात आला आहे. या अहवालात, मुंबईकरांचा दर वर्षाला लाखभर रूपये खर्च केवळ आरोग्यासाठी खर्च करत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबईकरांचा दर वर्षाला लाखभर रूपये खर्च केवळ आरोग्यासाठी होत असल्याचं समोर आलं आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रजा फाऊंडेशनच्या वतीने 'द स्टेट ऑफ हेल्थ इन मुंबई' हा मुंबईच्या आरोग्य स्थितीवर वार्षिक अहवाल प्रसिद्ध सादर करण्यात आला आहे. या अहवालात, दर वर्षाला होणाऱ्या आरोग्य खर्चा व्यतिरिक्त मुंबईत सार्वजनिक दवाखाने कमी असल्याचं चित्रंही समोर आलं आहे.

प्रजा फाऊंडेशने सादर केलेल्या अहवालात, 2019मध्ये वैद्यकीय सुविधांवर खर्च होणारं अंदाजे वार्षिक उत्पन्न 9.7 टक्के होतं. हे उत्पन्न मुंबईत दरडोई उत्पन्नाच्या आधारे प्रत्येक कुटुंबासाठी 98,214 रूपये इतकं आहे. याशिवाय शहरी भागात 40,598 लोकांसाठी एक सार्वजनिक दवाखाना असून पश्चिम उपनगरात 86,360 आणि पूर्व उपनगरांत 72,263 सार्वजनिक दवाखाने आहेत.

यासंदर्भात प्रजा फाऊंडेशनचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त निताई मेहता म्हणाले, "मुंबईतील रहिवासी त्यांच्या उत्पन्नातील मोठा भाग सतत आरोग्यावर खर्च करतात. 2017 मध्ये ही टक्केवारी 7.8 टक्के होती तर 2019 मध्ये हा आकडा 9.7 टक्क्यांपर्यंत पोहोचला. यानुसार, दरडोई उत्पन्नाचा मोठा भाग आरोग्यावर खर्च होत असल्याने शहरात या खर्चाचं प्रमाण वाढलंय. 2017मध्ये हा खर्च 19,209 कोटी एवढा होता, तर 2019 मध्ये हाच खर्च 27,795 इतका होता."

मेहता पुढे म्हणाले, "दवाखाना आणि लोकसंख्या गुणोत्तर पाहिलं तर मुंबईत 64,468 लोकांमागे एक दवाखाना आहे. नॅशनल अर्बन हेल्थ मिशनच्या मते प्रती 15 हजार लोकांमागे एक दवाखाना असण्याची गरज आहे. याशिवाय हे दवाखाने सकाळी 9 ते संध्याकाळी 4 या वेळेत सुरु असतात. त्यामुळे अनेकांना या आरोग्य सुविधांचा लाभ घेता येत नाही."

या अहवालातून समोर आलेले ठळक मुद्दे-

  • पालिकेच्या दर दवाखान्यात सरासरी केवळ एकच कर्मचारी नियुक्त. दवाखान्यासाठी संमत करण्यात आलेल्या पदांच्या तुलनेत उपलब्ध कर्मचाऱ्यांची 19 टक्क्यांनी कमतरता
  • मुंबईतील 73 टक्के (घरगुती स्तरावरील सर्व्हेक्षण) लोकांना आरोग्य योजनांची कल्पना नव्हती.
  • 2017 मध्ये शहरात मधुमेहाचे सर्वाधिक मृत्यू, दरदिवशी 26 मृत्यूंची नोंद
  • असंसर्गजन्य आजारामुळे होणाऱ्या सर्वाधिक मृत्यूचं कारण टीबी आहे

नरोत्तम शेखसरिया फाउंडेशनचे डॉ. मंगेश पेडणेकर म्हणाले की, "मुंबईत २० ते ३० टक्के नवीन टीबी रुग्ण वाढत आहेत. याबाबत पालिका प्रशासनाशी चर्चा झाली, पण पालिकेने हे मान्य केले नाही. बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे टीबी वाढतोय आणि खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांची नोंद पालिकेकडे नाही. या नव्या सर्व्हेक्षणानुसार अनेक लोक सरकारी व पालिका रुग्णालयात जाऊन उपचार घेतात. तर पालिका दवाखान्यात अनेक रुग्ण उपचारासाठी जातात. परंतु या ठिकाणी मनुष्यबळाची कमतरता आहे."

डॉ. मंगेश पुढे म्हणाले, "मुळात १५००० लोकांमागे एक दवाखाना असल्याची गरज आहे. इतकच नव्हे तर आथिकदृष्टया कमकुवत व्यक्तीला वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं अनेक योजना सुरूकेल्या आहेत. पण या योजनांबाबत लोकांमध्ये जागरुकता कमी असल्याने चित्र देखील समोर आले आहे."

यासंदर्भात 'माय मेडिकल मंत्रा'शी बोलताना आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले म्हणाले की, प्रजा फाऊंडेशनने दिलेल्या अहवालानुसार, ''रुग्णांची संख्या वाढत असल्याने दवाखान्यांवर रुग्णांचा भार पडतोय. त्यामुळे रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेच्या अख्यारित येणाऱ्या दवाखान्यातील बाह्यरुग्ण विभाग आता सायंकाळी देखील सुरू राहतील. 18 सप्टेंबरपासून या नव्या उपक्रमाला करण्यात येणार आहे. तर 15 दवाखान्यांमध्ये डॉक्टरांची नेमणूक करण्यासंदर्भात निविदा प्रक्रियेचं काम सुरू आहे. प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईतील 175 दवाखाने आणि 213 आरोग्य केंद्रांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.''

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top