Tuesday, 23 Apr, 5.45 am माय मेडिकल मंत्रा

होम
मुंबईत स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू

नागपूर, नाशिकनंतर आता मुंबईतही स्वाईन फ्लूने बळी घेतला आहे. मार्च महिन्यामध्ये मुंबईत स्वाईन फ्लूचे दोन बळी गेले आहे. जानेवारी ते एप्रिल राज्यात स्वाईन फ्लूमुळे 120 जणांचा जीव गेला आहे. तर 1300 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नाशिक, नागपूर, पुण्यात स्वाईन फ्लूने कहर माजवला आहे.

मुंबईत 2018 मध्ये फक्त स्वाईन फ्लूचा केवळ एकच बळी गेला होता. तर जानेवारी 2019 मध्ये एकाही स्वाईन फ्लू रुग्णाची नोंद नव्हती. मात्र फेब्रुवारीत स्वाईन फ्लूचे रुग्ण दिसून आले. तर आताप्रंयत मुंबईत स्वाईन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू झालाय.

यासंदर्भात माहिती देताना मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर म्हणाल्या, "यंदाच्या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत 2 जणांचा स्वाईन फ्लूने बळी गेलाय. मार्च महिन्यात या दोन्ही रूग्णांचा बळी गेलाय."

स्वाईन फ्लूचं वाढत प्रमाण लक्षात घेता यावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारद्वारे विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. स्वाईन फ्लूच्या गंभीर रुग्णांवर नेमके कसे उपचार करावेत, याबाबत मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आलीत. परंतु, तरीही सध्या स्वाईन फ्लूचा प्रसार वाढतोय. त्यात आता मुंबईतही स्वाईन फ्लूनं एकाचा बळी घेतल्यानं मुंबईकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

स्वाईन फ्लूची लक्षणं

 • ताप
 • घसा खवखवणं
 • अंगदुखी
 • थकवा
 • अतिसार, उलटय़ा
 • अचानक तोल जाणं
 • श्वसनाचा त्रास
 • मुलांची त्वचा निळसर होणं, अंगावर पुरळ येणं

स्वाईन फ्लूला प्रतिबंध कसा कराल

 • सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं
 • खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करा
 • नाकआणि तोंडावर मास्क बांधावा
 • हात वारंवार साबणाने धुवा
 • भरपूर पाणी प्या
 • संतुलित आहार घ्या
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top