Friday, 27 Mar, 8.35 pm माय मेडिकल मंत्रा

होम
मुंबईतील डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू्

  • मुंबईत कोरोनाचे दोन बळी
  • मुंबईतील डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू
  • एका खाजगी रूग्णालयात कार्यरत होते डॉक्टर

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या डॉक्टरांचं रूग्णालयात सीटी स्कॅन झाला होता. त्यावेळी त्यांना COVID-19 ची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. 85 वर्षांच्या या डॉक्टरांना पी.डी हिंदुजा रूग्णालयात आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र त्यांचा मृत्यू झाला.

या डॉक्टरांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. या डॉक्टरांना मधुमेह होता तसंच त्यांना पेसमेकरही होता.

राज्यात शुक्रवारी 28 COVID-19 रुग्णांची नोंद झालीये. राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 153 झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सांगलीतील बाधित रुग्णांच्या संपर्कातील 15 व्यक्तींचा तर नागपूर मधील बाधित आलेल्या रुग्णांच्या 4 सहवासितांचा समावेश आहे. या शिवाय प्रत्येकी 2 रुग्ण मुंबई आणि ठाणेमधील असून पालघर, कोल्हापूर, गोंदिया आणि पुण्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे तर 1 रुग्ण गुजरात राज्यातील आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top