Saturday, 28 Mar, 1.08 pm माय मेडिकल मंत्रा


N95 मास्क, गाऊन वाजवी दरात उपलब्ध करावेत, IMAची मागणी

राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या वाढतेय. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खाजगी डॉक्टरांना आपली ओपीडी, क्लिनिक्स आणि दवाखाने बंद न करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर आता इंडियन मेडिकल असोसिएशनने एक परिपत्रक काढून खाजगी डॉक्टरांनी दवाखाने का बंद ठेवले होते याची कारणं दिली आहेत. त्याचप्रमाणे आयएमए महाराष्ट्रकडून राज्य सरकारला विनंती करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील नागरिकांना कोरोनाच्या साथीमध्ये सर्वोतपरी वैद्यकीय मदत करण्यास आयएमए कटिबद्ध आहे. राज्यातील खाजगी डॉक्टरांचे दवाखाने आणि क्लिनिक सुरु रहावेत यासाठी आयएमएतर्फे आरोग्यमंत्री आणि कार्यकारी अधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की,

  • सर्व डॉक्टर आणि त्यांचा मेडिकल तसंच पॅरामेडिकल स्टाफ यांना सरकारमान्य ओखळपत्र द्यावीत.
  • महाराष्ट्रातील डॉक्टरांना एन95 मास्क, गाऊन आणि इतर वैयक्तिक संरक्षक साधनं वाजवी दरात दर आठवड्याला उपलब्ध करून द्यावीत.
  • 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ डॉक्टरांना एपिडेमिक कायद्यातील तरतूदीतून वगळावे.
  • सोसायटी किंवा घरमालकांना एखाद्या डॉक्टरकडे कोरोनाचा रूग्ण आढळून आल्यास राहती जागा रिकामी करण्याची सक्ती करू नये.
  • खाजगी दवाखान्यात कोरोना रूग्ण आढळल्यास डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ यांच्याबाबत काय उपचार करावेत याबाबत योग्य तो निर्णय आयसीएमआरच्या मदतीने घ्यावा.
Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top