Tuesday, 23 Apr, 5.45 am माय मेडिकल मंत्रा

होम
नागपूर- 12 हजार पोलिसांना देणार सीपीआर ट्रेनिंग

नागपूरमधील पोलिसांना आता सीपीआरचं ट्रेनिंग देण्यात येणारे. नागपूरच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने हा निर्णय घेतला असून येत्या वर्षभरात तब्बल 12000 पोलिसांना सीपीआर ट्रेनिंग देण्यात येणारे. जेणेकरून आपात्कालीन प्रसंगी एखाद्या रूग्णाला सीपीआर देण्यास पोलीस पुढाकार घेऊ शकतील.

एखादा अपघात झाला किंवा रस्त्यामध्ये काही आपात्कालीन परिस्थिती उद्भवली तर त्या व्यक्तीला तातडीने सीपीआर मिळावा यासाठी पोलिसांना आता सीपीआर ट्रेनिंग दिलं जाणारे. जर एखाद्या व्यक्तीला वेळीच सीपीआर दिला तर त्याचे प्राण वाचवता येऊ शकतं.

यासंदर्भात माय मेडिकल मंत्राशी बोलताना नागपूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला म्हणाले, "रस्त्यात अपघात झाला किंवा आपात्कालीन परिस्थिती उद्भवली तर पोलीस त्या ठिकाणी पहिले पोहचतात. अशावेळी जर रूग्णाला सीपीआरची गरज असेल तर पोलीस त्याला सीपीआर देऊ शकतात. त्यामुळे नागपूरच्या 12000 पोलिसांना सीपीआर देण्याचं प्रशिक्षण देण्यात येणारे."

डॉ. कुश पुढे म्हणाले, "पुढच्या महिन्यापासून पोलिसांना हे प्रशिक्षण देण्यात येईल. प्रत्येक झोननुसार पोलिसांची यासाठी निवड केली जाईल. प्रथम टप्प्यात पोलीस कॉस्टेबल यांनी ट्रेनिंद देण्यात येईल आणि त्यानंतर ग्रामीण भागातील पोलीस तसंच वाहतूक पोलीस यांना ट्रेनिंग देण्यात येणारे."

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top