Wednesday, 24 Apr, 7.12 am माय मेडिकल मंत्रा

मुंबई
निवडणूकीच्या धामधूमीत 'असे' फीट राहतात धनंजय मुंडे

निवडणूका म्हटलं की नेते दिवस-रात्र एक करतात. या काळात नेत्यांना आरोग्याकडे लक्षं देणं तसंच फीटनेस जपणंही महत्त्वाचं असतं. यासाठी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी डिसेंबरपासूनच आपला फीटनेस जपण्यास सुरुवात केली होती.

निवडणूका जवळ आल्या की नेत्यांची झोप उडते. सकाळी लवकर उठून रात्री उशीरा झोपणं हा बहुतेक नेत्यांचा दिनक्रम बनतो. दररोज कार्यकर्त्यांचा गराडा, भेटीगाठी, सकाळ-दुपार सभा यामुळे दररोजचं वेळापत्रक बिघडतं. मग अशामध्ये बाहेरचं अरबट-चरबट किंवा अवेळी खाणं हे देखील आलंच. मात्र निवडणूकीच्या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपला फीटनेस पुरेपुर जपलाय.

धनंजय मुंडे यांनी स्वतःचा फीटनेस जपत 5 महिन्यांमध्ये तब्बल 17 किलो वजन कमी केलंय. यासाठी त्यांनी दररोजचा आहार आणि व्यायाम यावर भर दिलाय.

माय मेडिकल मंत्राशी बोलताना विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, "फीट राहण्यासाठी मी डाएट आणि व्यायामावर भर देत होतो. डिसेंबरमध्ये माझं वजन 95 किलो होतं मात्र आता योग्य आहार आणि नियमित व्यायामामुळे वजनात 17 किलो घट झाली असून ते 77 किलोंवर आलंय. यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागलीये. आणि या मेहनतीचे परिणाम आता दिसू लागलेत."

मुंडे पुढे म्हणाले, "यासाठी नियमित व्यायाम महत्त्वाचा ठरलाय. सकाळी मी कपालभाती आणि सूर्यनमस्कार घालतो. याशिवाय सकाळी वेळ नाही मिळाला तर संध्याकाळी जवळपास 8 किलोमीटर पायी चालतो. यामध्ये रनिंगपण करतो. फक्त व्यायाम नाही तर आहारावर पण तितकचं लक्ष द्यावं लागतं. जंक फूड पूर्णतः बंद केलंय. याशिवाय साखर आणि भात हे देखील खाणं बंद केलंय. आहारात सोयाबीनची भाकरी, भाजी तसंच सूप यांचा समावेश सध्या केला जातोय."

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top