Tuesday, 23 Apr, 3.37 am माय मेडिकल मंत्रा

होम
निवडणूकीच्या काळात पाठीचं दुखणं कसं टाळाल?

सध्या निवडणूकीचे वारे वाहत असून प्रत्येकजण मतदान करून आपला हक्क बजावतोय. यावेळी अधिकारी देखील निवडणूकीच्या केंद्रावर बसून त्यांचं काम चोखरित्या पार पाडतात. मात्र अशावेळी दीर्घकाळ बसल्याने त्यांना पाठीच्या समस्या उद्भवू शकतात. या अधिकाऱ्यांसाठी तज्ज्ञांनी खास टीप्स दिल्यात.

निवडणुका जवळ आल्या की अधिकाऱ्यांच्या तासनतास ड्युटी देखील आल्याच. एकाच जागेवर बसून त्यांना मतदानाचं काम पार पाडावं लागतं. आणि अशातच जर एखाद्या अधिकाऱ्याला पाठीदुखीचा त्रास असेल तर तो अजून बळावण्याची शक्यता असते.

हा त्रास वाढू नये यासाठी QI Spine Clinicच्या स्पाईन स्पेशालिस्ट डॉ. शितल अधलखा यांनी सांगितलं, "ज्या व्यक्ती सतत 10 तास बसून काम करतात त्यांना पाठीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. निवडणूकीच्या काळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील दीर्घकाळ बसल्याने पाठीच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. दीर्घकाळ एकाच जागी आणि एकाच स्थितीत बसल्याने पाठदुखीसोबत पाठीच इतर गंभीर त्रास देखील उद्भवू शकतात."

यासाठीच निवडणूकीच्या अधिकाऱ्यांसाठी डॉ.शितल यांनी खास टीप्स दिल्यात.

योग्य पद्धतीने बसा

मान खाली ठेऊन बसणं शक्यतो टाळावं. पाय जमिनीवर ठेवा आणि पाठ थोडी मागे ठेऊन हिप्सवर योग्य वजन देऊन बसा.

lumbar roll चा वापर करा

तुमच्या पाठीला आधार मिळावा यासाठी lumbar rollचा वापर करा. बसल्यानंतर पाठीला हे lumbar roll ठेवा. जेणेकरून पाठीला त्रास होणार नाही.

मोबाईलमध्ये टायमर लावून ठेवा

दीर्घकाळ एकाच स्थितीत बसू नये यासाठी तुमच्या फोनमध्ये काही वेळाचा टायमर लावा, जेणेकरून तुम्ही बसलेली स्थिती तुम्हाला बदलायचीये हे तुमच्या लक्षात येईल.

शारीरिक हालचाल करा

जर तुम्ही कार्यरत असलेल्या केंद्रावर मतदारांची संख्या कमी असेल तर काही काळाने उभे रहा आणि एखादी फेरी मारा. दर 20 मिनिटांनी असं करा.

छोटे व्यायाम करा

प्रत्येकवेळी तुम्हाला जागेवरून उठणं शक्य राहणार नाही. अशावेळी जागेवर बसून सोपो व्यायाम करा. जेणेकरून स्नायू आखडणार नाहीत. यासाठी तुम्ही मानेचे, खांद्याचे व्यायाम करू शकता.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top