Monday, 22 Jul, 4.51 pm माय मेडिकल मंत्रा

होम
NMC विधेयक लोकसभेत सादर

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी हे विधेयक लोकसभेत सादर केलं आहे.

नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक (NMC) लोकसभेत सादर करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी हे विधेयक लोकसभेत सादर केलं आहे. हे विधेयक आणल्यामुळे मेडिकल काऊंन्सिल ऑफ इंडिया बरखास्त होणार आहे.

या विधेयकाअंतर्गत एमबीबीएसची परीक्षा हीच नॅशनल एक्झिट एक्झाम असेल असा निर्णय सरकारने दिला आहे. त्यामुळे एमबीबीएसच्या गुणांवर विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रॅक्टिस करण्याचं लायसेन्स मिळेल आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी देखील हीच परीक्षा ग्राह्य धरली जाईल.

सध्या प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBS परीक्षेचा पॅटर्न वेगवेगळा आहे, त्यामुळे MBBS परीक्षा पास होणारा विद्यार्थ्याच्या गुणवत्तेबाबत खात्री देता येत नाही. या विधेयकात देशभरात MBBSची अंतिम परीक्षा समानच असेल.

देशातील प्रत्येक भागात वैद्यकीय शिक्षण हे चांगलं आणि परवडणारं मिळावं हा या विधेयकाचा उद्देश आहे.

केंद्र सरकारने मनमानी पद्धतीने लाखो रूपये फी उकळणाऱ्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांना चाप लावला आहे. केंद्राने खाजगी वैद्यकीय महाविद्यालय आणि अभिमत विद्यापीठातील 50 टक्के जागांची फी नियंत्रणात आणली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top