Thursday, 09 May, 3.51 pm माय मेडिकल मंत्रा

होम
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी यावर्षी मराठा आरक्षण नाही - सुप्रीम कोर्ट

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी यावर्षी मराठा आरक्षण लागू न करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे आणि राज्य सरकारची याचिका फेटाळली आहे.

  • या वर्षी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू नाही
  • मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला
  • मराठा आरक्षणाबाबतची राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
  • नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती देण्याबाबत राज्य सरकारने केली होती याचिका

यंदाच्या शैक्षणिक वर्षात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारची याचिका फेटाळत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.

'माय मेडिकल मंत्रा'शी बोलताना सरकारी वकील निशांत कातनेश्वरकर म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारची याचिका फेटाळली आहे आणि पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत वाढवून दिली आहे. प्रवेशासाठी मुदत 18 मे ऐवजी आता 25 मे अशी करण्यात आली आहे. वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी पुढील वर्षापासून मराठा आरक्षण लागू होईल."

मराठा आरक्षण लागू होण्यापूर्वी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होत नाही, असं म्हणत विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. त्यानंतर यावर्षी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू नाही, असा निर्णय नागपूर खंडपीठानं दिला.

उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी याचिका दाखल केली. या याचिकेवर गुरुवारी 9 मे, 2019 ला सुनावणी झाली. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचं, सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top