Saturday, 21 Mar, 6.06 pm माय मेडिकल मंत्रा


परदेश प्रवासाचा इतिहास नसलेल्या महिलेला कोरोनाची लागण

  • राज्यात कोरोना रूग्णांची संख्या 64 वर
  • परदेश प्रवासाचा इतिहास नसलेल्या एका महिलेला कोरोनाची लागण
  • कोरोनाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरु कऱण्याचे निर्देश

राज्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. आतापर्यंत 64 जणांना या विषाणूची लागण झाल्याची माहिती आहे. शनिवारी आजाराचे एकूण 12 नवीन रुग्ण आढळले मात्र यामध्ये परदेश प्रवासाचा इतिहास नसलेल्या एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं समजलं आहे.

कुठल्याही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक 41 वर्षांची पुण्यातील महिला करोना बाधित आढळलेली आहे. ही महिला कोरोना बाधित येण्यामागील कारण तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल. दरम्यान इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने प्रयोगशाळा चाचणीचे निकष बदलले असून संसर्गाच्या सामाजिक प्रसाराची चाचपणी सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कोरोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे. मात्र पाळीव प्राण्यांपासून कोरोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणं नाहीत. त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असं आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलं आहे.

राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण 1861 प्रवासी आलेत. 18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 1592 जणांना भरती करण्यात आलंय. भरती करण्यात आलेल्यापैकी 1208 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 64 जण पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top