Friday, 14 Feb, 6.12 pm माय मेडिकल मंत्रा

होम
प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही, याला कारण.

रोज व्यायाम, जॉगिंग करताय, खाणंही कमी केलंय... पण तरीही वजन कमी होत नाहीये? मग खालील कारणं तपासून पाहा. नक्कीच या कारणांमुळे तुमचं वजन वाढतंय.

बरेच दिवस झाले तुमचं वजन वाढलंय. काही केल्या कमी होत नाहीये. नक्कीच तुम्ही काहीतरी चुकीचं करत आहात. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचं वजन कमी होत नाहीये?

शरीरात पाण्याची कमतरता

यामध्ये सर्वात पहिलं कारण म्हणजे, तुमच्या शरीरात कमी झालेलं पाणी. जर तुम्ही डाएट करताय. पण दिवसभरात कमी पाणी पिताय, तर तुमचं वजन कमी होणार नाही. शरीरात वाढलेली चरबी कमी करण्यासाठी पाण्याची गरज असते. पण शरीरात इतर गोष्टींसाठीही पाणी गरजेचे असते. ज्यामुळे शरीर यंत्रणा चालू असते. पण जर तुम्ही पाणी कमी प्यायलात तर शरीराला पाणी पुरवून वापरावे लागते. तेव्हा शरीर पाण्याच्या वापरासाठी प्राधान्यक्रम ठरवते. यात शरीर चरबी कमी करण्यासाठी पाणी वापरणे बंद करते. व तुमचे वजन वाढत जाते. म्हणूनच पुरेसं पाणी प्या, जेणेकरून इतर प्रक्रियेबरोबरच शरीर चरबी कमी करण्यासाठीही पाणी वापरेल.

प्रिझर्वेटिव्ह अन्न

वजन कमी करण्यासाठी आपण खाणं कमी करतो. त्यासाठी काहीवेळा लोकं बंद डब्यातील दही खातात. पण सर्वात पहिल्यांना कमी चरबी असलेलं बंद डब्यातील दही खाणंच बंद करायला हवं. कारण हे दही तुमची फक्त भूक संपवत नाही, त्याचबरोबर तुम्हाला असमाधानीही ठेवतं. या अशा बंद डब्यातील पदार्थांमध्ये कृत्रिम संरक्षकांचा (प्रिझर्वेटिव्ह) वापर केलेला असतो. जो तुमचं वजन नक्कीच वाढवतो.

चरबीयुक्त आहाराचं असंतुलन

शरीराला चरबीची गरज असते. त्यामुळे कमी चरबी असलेले पदार्थ खाण्यापेक्षा शरीराला आवश्यक प्रमाणात चरबी असलेले पदार्थ खा. ज्यामुळे तुमची भूक पूर्ण होईल आणि तुम्ही उत्साही राहाल.

मानसिक तणाव

एका पाहणीनुसार आपलं अधिकतर वजन विचारांमुळेच वाढत असल्याचं दिसून आलंय. मनावर असलेला ताण आपल्या शरीरातील संप्रेरकांची पातळी असंतुलित करतो. यातून आपले कोलेस्ट्रॉल वाढते आणि आपल्या वजनातही वाढ होत जाते.

प्रथिनांचं अतिरिक्त प्रमाण

त्याचप्रमाणे शरीरात प्रथिनांचे प्रमाण वाढल्यास आपले वजन वाढते. म्हणजेच आपल्या रोजच्या जेवणामधून जी प्रथिनं खातो त्यांचे अतिरिक्त प्रमाण शरीरात चरबीस्वरूपात साठवले जाते आणि आपली जाडी वाढते. आपल्या शरीरातील स्नायूंना, रक्तासाठी प्रथिनांची आवश्यकता असते, पण त्याचं अतिरिक्त सेवन लठ्ठपणाचं एक कारण होऊ शकतं. त्यामुळे मोजून-मापून जेवा.

फॉक्सन्यूज.कॉम

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top