Saturday, 15 Feb, 1.56 pm माय मेडिकल मंत्रा

होम
तणावामुळे महिलांमध्ये वाढतो हृदयविकारांचा धोका

नवीन संशोधनाप्रमाणे, मानसिक ताण-तणावामुळे महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत हृदय विकारांचा धोका जास्त वाढतो. मानसिक तणावामुळे महिलांच्या शरीरातील पेरिफेरल(हृदया बाहेरील) धमन्यांवर जास्त परिणाम होतो. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि यामुळे हृदयाला रक्त पुरवठा कमी होतो.

कामाचा वाढणारा ताण, टेन्शन आणि तर गोष्टींमुळे प्रत्येकाच्या मनावर दडपण येतं. प्रत्येक व्यक्तीला मानसिक ताण-तणावाला सामोरं जावं लागतं. मानसिक ताण कसा कमी करता येईल यासाठी प्रत्येक व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि इमोशनल बदल करतो. यामुळे आपल्याला ताण-तणाव जास्त झाला की तो कमी करण्यासाठी संकेत मिळतात.

मानसिक ताण-तणावात व्यक्तीच्या मेंदूवर खूप दडपण येतं. अशा परिस्थितीत रक्तवाहिन्या मेंदूकडे रक्ताचा जास्त पुरवठा करतात. ज्या व्यक्ती निरोगी असतात त्यांना मेंदूला रक्त पुरवठा झाल्याने अलर्ट राहण्याचे संकेत मिळतात. पण, ज्या व्यक्तींना हृदयविकार आहे अशा व्यक्तींमध्ये रक्तवाहिन्या आकुंचन पावल्याने हृदयाला होणारा रक्त पुरवठा कमी होतो. संशोधनाप्रमाणे, ५० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांमध्ये मानसिक तणावामुळे हृदयाला कमी रक्त पुरवठा होतो.

इमोरी विद्यापीठाच्या रोलीन्स स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या डॉ. विओला वॅकॅरिनो म्हणतात, "हे संशोधन महत्त्वाचं आहे कारण, याआधी करण्यात आलेल्या संशोधनात मानसिक ताण-तणावामुळे हृदयाला रक्तपुरवठा कमी होतो हे स्पष्ट झालंय. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. ही परिस्थिती ज्या रुग्णांना हृदयाकडे रक्त कमी पोहोचतं अशाच प्रकारची असते."

या संशोधनासाठी ६७८ लोकांवर अभ्यास करण्यात आला. हाताच्या बोटांना रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांवर संशोधन करण्यात आलं.

या संशोधनातून ही माहिती समोर आली की, ज्या महिलांना मानसिक त्रास किंवा ताण-तणाव आहे अशा महिलांमध्ये हृदयाला रक्तपुरवठा कमी होतोय. पण, पुरुषांमध्ये मानसिक ताण-तणावात ब्लड प्रेशर आणि हृदयाचे ठोके वाढतात. ज्यामुळे हृदयाला रक्त पुरवठा कमी होतो.

डॉ. विओना पुढे म्हणतात, "आमच्या संशोधनात मानसिक तणावात रक्तवाहिन्यात नक्की काय होतं हे देखील समजलं. मानसिक ताण-तणावात हृदयात रक्त पुरवठा वाढण्यापेक्षा कमी झाल्याचं समोर आलं."

या संशोधनातून मानसिक ताण-तणावात असताना स्वत:ला रिलॅक्स करण्यासाठी कोणत्या प्रकारचे शारीरिक व्यायाम करायला हवेत किंवा ते चांगल्या पद्धतीने कसे करता येऊ शकतात याबाबत चांगली माहिती मिळू शकते.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top