Monday, 16 Sep, 12.37 pm माय मेडिकल मंत्रा

होम
वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होणार- मुख्यमंत्री

महाराष्ट्रात वैद्यकीय महाविद्यालयं मोठ्या संख्येने सुरू होत आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत आहे. केंद्र सरकारने एक हजार जागा वाढवून दिलेल्या आहेत. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालतील क्षमता वाढवली असून येत्या दोन-तीन वर्षात वैद्यकीय शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होतील, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती (जिल्हा पुणे) या महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे ई-लोकार्पण व वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रथम तुकडीचा ई-शुभारंभांच्या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, महसूलमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक माजी मंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

याविषयी बोलताना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन म्हणाले, "जे.जे.रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारती साठी 1200 कोटी उपलब्ध करून देण्यात येत आहे. बारामतीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला 2014 मध्ये परवानगी मिळाली होती, त्यासाठी 500 कोटी देण्यात आला असून प्रवेश सुरू झालेत. याशिवाय राज्यात आणखी 7 नवीन वैद्यकीय कॉलेज सुरू होतील. केंद्राकडे एकूण 35 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे."

महाजन पुढे म्हणाले, राज्य सरकारने जळगावच्या वैद्यकीय, दंतवैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि भौतिकोपचार महाविद्यालयांची निर्मिती करुन शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल सुरू करण्यास 2017 मध्ये मान्यता दिली आहे. एकाच छताखाली विविध प्रकारची चिकित्सा पद्धती एकाच संकुलात मिळावीत म्हणून अशा प्रकारचा सरकारचा राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. या संकुलाच्या उभारणीमुळे आधुनिक तसेच प्राचीन वैद्यकीय चिकित्सा पद्धतीमध्ये आंतरशाखीय संशोधनास चालना मिळेल."

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Medical Mantra Marathi
Top