Tuesday, 11 Aug, 8.38 am माय नगर

अहमदनगर
म्हणून महापालिकेची कार्यालये सात दिवस बंद राहणार

माय अहमदनगर वेब टीम

अहमदनगर - महापालिका कर्मचार्‍यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने, ही साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता मनपाची सर्व कार्यालये सोमवारपासून (दि.10) पासून 7 दिवस बंद राहणार आहेत. या कालावधीत 'वर्क फ्रॉम होम' करण्याच्या सूचना आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिल्या आहेत. दरम्यान, नागरिकांसाठी मनपाने हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत.

कामगार युनियनने 14 दिवस सर्व कार्यालये बंद ठेवून कर्मचार्‍यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. आयुक्त निर्णय घेवो अगर न घेवो, कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी युनियनच्या वतीने सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी करणार असल्याचे युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मनपात गेटसभा होऊन कालपासून काम बंद करण्यात आले. युनियनच्या मागणीनुसार आयुक्त मायकलवार यांनी बैठक घेत, पुढील 7 दिवस अत्यावश्यक सेवा वगळता महापालिकेची सर्व कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेत, 'वर्क फ्रॉम होम' करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

नागरिकांना अडचणी, तक्रारींसाठी अधिकारी, कर्मचार्‍यांचे हेल्पलाईन क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सचिव आनंदराव वायकर यांनी प्रभाग कार्यालयातील कर्मचार्‍यांनाही नागरिकांच्या तक्रारींबाबत दखल घेऊन काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: My Nagar
Top