Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमरावती जिल्ह्यातील सर्वच मोठ्या आस्थापनांचे फायर ऑडिट होणार! •पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

अमरावती जिल्ह्यातील सर्वच मोठ्या आस्थापनांचे फायर ऑडिट होणार! •पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

Nagpur Today 1 week ago

मुंबई: अमरावती जिल्ह्यातील सर्व मोठ्या आस्थापनांचे अग्निसुरक्षा व्यवस्थेचे परीक्षण (Fire Audit) व आग प्रतिबंधक सराव (Fire drill) एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील (डफरीन)बालके मृत्यूच्या घटनेची अतिशय गंभीर दखल महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे घेतली, ही घटना २४ ऑगस्ट रोजी पहाटे ३.३० वाजता घडल्यानंतर सकाळी चारवाजेपासून संबंधित सर्व यंत्रणांशी संपर्क साधून आवश्यक निर्देश दिले.
या दुर्दैवी घटनेत ३ नवजात बालकांचा मृत्यू झाला. मृत बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी रु. ५ लक्ष मदत जाहीर करण्यात आली. पालकमंत्री बावनकुळे यांच्या सुचनेनुसार एकूण ३६ नवजात बालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलविण्यात आले. त्यापैकी २९ नवजात बालकांना पुढीलप्रमाणे विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अमरावती ११,डॉ.मुरके रुग्णालय, अमरावती ८, होप रुग्णालय, अमरावती ८,पारिजात रुग्णालय दोन अशा २९ नवजात बालकांवर विनामूल्य उपचार करण्याबाबत निर्देश दिले असुन त्यांचा मोफत उचार सुरु आहे. तसेच ७ नवजात बालके त्यांच्या मातांसोबत जिल्हा स्त्री रुग्णालयात वैद्यकीय देखरेखीखाली सुरक्षित आहेत.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्यमंत्री व आरोग्य सचिवाना तातडीने घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठविले होते. त्यांनी दुपारी १.३० वाजता घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आरोग्य आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली दहा सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून, सात दिवसांच्या आत समितीने वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! "होटल वालों से होती है...

नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews

मुंबई में किसान आंदोलन! 'वर्षा' की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...

12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews

अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Nagpur Today Marathi