Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
गोल्डन व्हॉईस चॅम्पियनशिप २०२६'चा ग्रँड फायनल  २१ ऑगस्टला

गोल्डन व्हॉईस चॅम्पियनशिप २०२६'चा ग्रँड फायनल २१ ऑगस्टला

Nagpur Today 3 days ago

नागपूर: RDK Entertainment अंतर्गत Roof Light Studio, Damini Creation आणि KV Singing Club यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'Golden Voice Championship 2026' या भव्य कराओके सोलो सिंगिंग स्पर्धेचा ग्रँड फायनल शुक्रवार, दि.

२१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत अमृत भवन हॉल, १७९ नॉर्थ अंबाझरी रोड, रामदास पेठ, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या स्पर्धेच्या ऑडिशन व सेमीफायनलनंतर निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये आता अंतिम विजेतेपदासाठी चुरशीची लढत रंगणार आहे. १८ वर्षे व त्यावरील वयोगटासाठी खुल्या असलेल्या या स्पर्धेत केवळ कराओकेच्या माध्यमातून सोलो गायनाला प्रोत्साहन देण्यात आले आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार असून प्रथम क्रमांकासाठी ₹१५,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹११,००० आणि तृतीय क्रमांकासाठी ₹७,००० तसेच ट्रॉफी, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ व विशेष स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी १२ 'स्वरसाधना गौरव विशेष पुरस्कार' देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेचे संचालक म्हणून सौ. भारती दयापुरकर - Damini Creation, सौ. मनीषा चौधरी - Roof Light Studio आणि श्री. चरण कांडलकर - KV Singing Club कार्यरत आहेत. स्पर्धेला मॉडेल व प्लेबॅक सिंगर वेदिका धांडले तसेच सौ. संगीता खुरड यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

संगीत क्षेत्रातील नवोदित तसेच हौशी गायकांना व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रँड फायनलमध्ये निवड झालेल्या सर्व स्पर्धकांच्या सादरीकरणामुळे संगीतप्रेमींना एक सुरेल आणि अविस्मरणीय संध्याकाळ अनुभवता येणार आहे.

'एक स्पर्धा नाही… एक परिवार!' या भावनेतून आयोजित केलेला कार्यक्रम

LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY

रामझूला पर राहगीर को घेरा, मोबाइल-नकदी छीनी! #NagpurCrime #Ramjhula #RobberyCase #CrimeBranch

5 साल की किशा की दर्दनाक मौत, CCTV में कैद पूरी घटना...

Nagpur Crime: अस्पताल से चोरी हुई नवजात बच्ची सकुशल मिली #Nagpur #DagaHospital...

भाई-बहन को आखिरी बार टाटा... फिर हुआ दर्दनाक हादसा! #NagpurNews #Accident #Ganeshpeth...

सीओईपी विवाद पर बीजेपी-कांग्रेस आमने-सामने..

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Nagpur Today Marathi