Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाराष्ट्रात ४० लाख कथित बांगलादेशींनी एन्यूमरेशन फॉर्म भरल्याचा किरीट सोमय्यांचा दावा

महाराष्ट्रात ४० लाख कथित बांगलादेशींनी एन्यूमरेशन फॉर्म भरल्याचा किरीट सोमय्यांचा दावा

Nagpur Today 1 week ago

र्धा : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्रातील मतदार पडताळणी (SIR) प्रक्रियेबाबत गंभीर आरोप करत मोठा दावा केला आहे. एसआयआर प्रक्रियेदरम्यान मशिदींमधून मोठ्या प्रमाणात बोगस एन्यूमरेशन फॉर्म भरले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

तसेच, महाराष्ट्रात आतापर्यंत ४० लाखांहून अधिक कथित बांगलादेशी नागरिकांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे एन्यूमरेशन फॉर्म भरल्याचा दावाही त्यांनी केला.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले की, हिंगणघाटमध्येही सुमारे ८ हजार अशा व्यक्तींच्या नावाने एन्यूमरेशन फॉर्म भरल्याची माहिती मिळाली आहे, जे येथे वास्तव्यास नसून मूळचे बांगलादेशातील असल्याचा त्यांचा दावा आहे. या संपूर्ण प्रकरणावर संबंधित यंत्रणांकडे आक्षेप नोंदविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राच्या मतदार यादीत एकही बांगलादेशी मतदार राहू देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत त्यांनी एसआयआरचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. एन्यूमरेशन फॉर्म भरण्यासाठी अवघे आठ दिवस शिल्लक असून, अद्याप सुमारे ३० टक्के मतदारांनी फॉर्म भरलेले नाहीत. त्यामुळे सर्व पात्र मतदारांनी तातडीने आपले एन्यूमरेशन फॉर्म भरावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

ई-20 विरोध में युवक कांग्रेस का प्रदर्शन #nagpurnews #e20 #ethenol #nitingadkari #maharashtranews

लगातार बारिश से कपास पर रस चूसने वाले कीटों का प्रकोप #maharashtranews...

पेपर लीक के खिलाफ संभाजी ब्रिगेड का जोरदार प्रदर्शन #maharashtranews #nanded #newsupdate...

भातसा बांध के पांच गेट 100 सेंटीमीटर तक खोले गए #maharashtranews #shahpur...

नागपुर में दर्दनाक घटना; घर से दुर्गंध आने पर खुला राज.. #Nagpur...

भुजबल को पालकमंत्री बनाओ: एनसीपी युवा कांग्रेस की मांग #maharashtranews #nashik #newsupdate...

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Nagpur Today Marathi