Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नागपूरच्या रामझुल्यावर  चोरी;४८ तासांत चार आरोपी जेरबंद

नागपूरच्या रामझुल्यावर चोरी;४८ तासांत चार आरोपी जेरबंद

Nagpur Today 1 day ago

नागपूर : गणेशपेठ परिसरातील रामझुला पुलावर प्रवाशाला अडवून त्याचा मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावून नेल्याच्या घटनेचा गुन्हे शाखेच्या चैन स्नॅचिंग विरोधी पथकाने अवघ्या ४८ तासांत छडा लावला.

या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी तक्रारदार मध्य प्रदेशात जाण्यासाठी रेल्वे स्थानकाच्या दिशेने जात होता. रामझुला पुलावर पोहोचला असता आरोपींनी त्याला अडवून त्याच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम जबरदस्तीने हिसकावली आणि घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी गणेशपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या चैन स्नॅचिंग विरोधी पथकाने समांतर तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत ४८ तासांच्या आत चौघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या ताब्यातून दोन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये विनोद ऊर्फ मायकल गर्जेश मालाकार, कन्हैया मालाकार आणि राहुल ऊर्फ पगला मालाकार यांच्यासह एका आरोपीचा समावेश आहे. मुख्य आरोपी विनोद ऊर्फ मायकल याच्याविरुद्ध गणेशपेठ पोलिस ठाण्यात यापूर्वीही विविध कलमांनुसार गुन्हे दाखल असून, त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Nagpur Bomb Threat: स्कूल-कॉलेजों की सुरक्षा पर बड़ा मंथन.. #NagpurSchoolThreat #BombThreat #School

Nagpur Police का बड़ा कदम! SHE Teams की तर्ज पर निर्भया पथक.....

Nagpur Daga Hospital: 1 दिन की नवजात बच्ची गायब होने से सुरक्षा...

युवाओं को ड्रग्स से बचाना देश की प्राथमिकता...

राहुल गांधी के कार्यक्रम पर उदय सामंत का हमला...

बारिश नहीं हुई तो सोयाबीन फसल बर्बाद होने का डर....

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Nagpur Today Marathi