Dailyhunt
पाच राज्यांचा निकाल जाहीर; भाजपची दमदार मुसंडी, काही ठिकाणी सत्तांतराचे संकेत!

पाच राज्यांचा निकाल जाहीर; भाजपची दमदार मुसंडी, काही ठिकाणी सत्तांतराचे संकेत!

Nagpur Today 5 days ago

वी दिल्ली - देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्ष (भाजप) ने काही राज्यांत प्रभावी कामगिरी करत आपली ताकद अधोरेखित केली आहे, तर काही राज्यांत प्रादेशिक पक्षांनीही जोरदार पुनरागमन केले आहे.

सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाचही राज्यांचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत.

राज्यनिहाय निकाल खालीलप्रमाणे….
पश्चिम बंगाल -
पश्चिम बंगाल मध्ये भाजपने ऐतिहासिक यश संपादन करत स्पष्ट बहुमत मिळवले.
भाजप - 194
तृणमूल काँग्रेस - 93
काँग्रेस - 0
डावे पक्ष - 3
इतर - 2
तामिळनाडू-
तामिळनाडू मध्ये यंदा मोठा राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. टीव्हीके (विजय थलपती) पक्षाने द्रमुक-अण्णाद्रमुकला मागे टाकत आघाडी घेतली.
द्रमुक - 60
अण्णाद्रमुक - 65
टीव्हीके - 109
इतर - 9
केरळ-
केरळ मध्ये दीर्घकाळ सत्तेत असलेल्या डाव्या आघाडीला मोठा धक्का बसला असून काँग्रेस सत्तेच्या उंबरठ्यावर.
काँग्रेस - 101
डावी आघाडी - 37
इतर - 2
आसाम-
आसाम मध्ये भाजपने पुन्हा एकदा सत्ता राखण्यात यश मिळवले.
भाजप - 98
काँग्रेस - 24
इतर - 4
पुद्दुचेरी-
पुद्दुचेरी मध्येही भाजपने आघाडी घेत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केला.
भाजप - 22
काँग्रेस - 6
इतर - 1
महाराष्ट्रातील पोटनिवडणुकीचे चित्र-
राहुरी पोटनिवडणूक-
राहुरी येथे भाजपचे अक्षय कर्डिले प्रचंड आघाडीवर.
अक्षय कर्डिले - 1,15,855
गोविंद मोकाटे (राष्ट्रवादी SP) - 24,876
इतर उमेदवार मागे
कर्डिले तब्बल 90,979 मतांनी आघाडीवर
बारामती पोटनिवडणूक-
बारामती मध्ये सुनेत्रा पवार यांचे एकतर्फी वर्चस्व कायम.
एकूण मते - 1,89,657
इतर - 4,156
सुरुवातीपासूनच मोठी आघाडी, विजय जवळपास निश्चित मानले जात आहे.
दरम्यान या निकालांमुळे देशातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. भाजपने आपली राष्ट्रीय पकड मजबूत केल्याचे दिसत असताना, तामिळनाडूसारख्या राज्यात नव्या राजकीय शक्तीचा उदय झाला आहे. केरळमध्ये सत्तांतराची चिन्हे दिसत आहेत, तर आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.आता या निकालांनंतर विरोधक कोणती रणनीती आखतात आणि आगामी निवडणुकांसाठी काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Nagpur Today Marathi