Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शाळेत शिक्षकच नाहीत; विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातच भरवला वर्ग, अनोख्या आंदोलनाने प्रशासनाला जाग!

शाळेत शिक्षकच नाहीत; विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातच भरवला वर्ग, अनोख्या आंदोलनाने प्रशासनाला जाग!

Nagpur Today 5 days ago

भंडारा : जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील सोरणा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक नसल्याने संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि ग्रामस्थांनी मंगळवारी थेट जिल्हा परिषद कार्यालय गाठत शिक्षण विभागाच्या दालनाबाहेरच वर्ग भरवला.

या अनोख्या आंदोलनामुळे शिक्षण व्यवस्थेतील गंभीर समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे.

सोरणा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत ४४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शाळेत एकही शिक्षक कार्यरत नसल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण अनेक दिवसांपासून ठप्प झाले आहे. शिक्षकांची नियुक्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी वारंवार शिक्षण विभागाकडे केली होती. मात्र, "जिल्ह्यात शिक्षकांची कमतरता आहे," असे कारण देत प्रशासनाकडून केवळ आश्वासनेच मिळाल्याचा आरोप पालकांनी केला.

प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी वेगळा मार्ग स्वीकारला. त्यांनी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद कार्यालयात आणले आणि शिक्षण विभागाच्या कार्यालयाबाहेरील परिसरातच वर्ग सुरू केला. हातात पुस्तके, वह्या आणि पेन घेऊन विद्यार्थी जमिनीवर बसून अभ्यास करत असल्याचे दृश्य पाहून अधिकारीही काही काळ गोंधळून गेले.

यावेळी पालकांनी अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारला, "शाळेत शिक्षकच नसतील तर आमच्या मुलांनी शिक्षण घ्यायचे कुठे?" या आंदोलनानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरच शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आश्वासन दिले.

मात्र, ग्रामस्थांनी केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तातडीने शिक्षक उपलब्ध न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन आणि तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

या घटनेमुळे ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबवला जात आहे, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कामठी में ट्रेन की चपेट में आने से 14 वर्षीय किशोर की...

70 ग्राम MD Drugs के साथ आरोपी गिरफ्तार #NagpurNews #Crime #MDDrugs #Mephedrone...

"रिश्तों को किया शर्मसार! रिश्तेदार ने युवती को भेजे अश्लील मैसेज #NagpurNews...

ट्रक से सामान गिरा, फ्लाईओवर पर जाम #maharashtranews #bhiwandi #newsupdate #maharashtra

अजित गुट छोड़ शरद गुट में वापसी..

बस की टक्कर से दो दोस्तों की मौत

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Nagpur Today Marathi