Dailyhunt
विरोधीपक्ष नेते संजय महाकाळकर यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या अडचणी

विरोधीपक्ष नेते संजय महाकाळकर यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या अडचणी

Nagpur Today 1 week ago

नागपूर : शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यू कंपनीच्या संबधित विविध तक्रारींच्या निराकरणासाठी पुढील आठ दिवसांत कारवाई करण्यात यावी, पाणीपुरवठ्याच्या संदर्भात नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मनपाचे विरोधीपक्ष नेते श्री.

संजय महाकाळकर यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले.

शहरातील पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर यांच्या कार्यालयात सोमवारी(ता.४) महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत नगरसेवक श्री. शैलेश पांडे, श्री. वासिम खान, श्री.अभिजीत झा. श्री. केतन ठाकरे, श्री.दिनेश यादव, श्री. अतुल कोटेचा, श्री. विवेक निकोसे, श्री. सुहास नानवटकर, नगरसेविका श्रीमती सरस्वती सलामे यांच्यासह इतर नगरसेवक, नगरसेविका, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाच्या अधिक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत वाईकर, यांच्यासह ओसीडब्ल्यू चे सर्व झोनल प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

बैठकीत सर्वप्रथम उपस्थित नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागामध्ये उद्भवणाऱ्या पाणीटंचाई, कमी दाबाने पाणीपुरवठा, पाईपलाईन गळती, तसेच अनियमित वितरण यांसारख्या समस्यांची सविस्तर माहिती दिली. यानंतर विरोधी पक्षनेते श्री. संजय महाकाळकर यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी समस्यांबाबत नाराजी व्यक्त करत तातडीने उपाययोजना राबविण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. तसेच, समस्यांचे निराकरण ठराविक कालमर्यादेत करण्याचे निर्देश देण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Nagpur Today Marathi