Friday, 23 Jul, 7.27 am नाशिक LIVE

होम
अखेर नाशिकमध्ये बहुचर्चित आंतरधर्मीय विवाह पडला पार

नाशिक लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । गेल्या काही दिवसांपासून राज्यात चर्चेचा ठरलेला नाशिकमधील रसिका आडगावकर व आसिफ खान यांचा विवाहसोहळा अखेर पार पडला. हिंदु व मुस्लिम दोन्ही पध्दतीने हा विवाह लावण्यात आला.

अनेक हिंदू संघटनांनी या विवाहाला लव्हजिहादचा रंग देण्याचा प्रयत्न करत विवाह होऊ न देण्याचा इशारा दिला होता. सोशल मीडियावर या विवाहाचे वर्णन लव्ह जिहाद असे करत हा विवाह रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र, धर्मांध संघटनांच्या विरोधाला झुगारून अनेक सामाजिक संघटनांच्या पाठिंब्यासह हा विवाह संपन्न झाला.

विशेष मुलगी दिव्यांग असून या लग्नाबाबत परिस्थिती वेगळी असल्याचे सांगत मंत्री बच्चू कडू यांनी या लग्नास समर्थन दिले होते. त्यानंतर 18 जुलैला होणारा हा विवाह रद्द करण्यात आला होता. हा विवाह होणार की नाही अशी शंका होती, मात्र गुरुवारी शहरातील एका हॉटेलमध्ये सकाळी हिंदू पद्धतीने मंत्रोच्चारात तर सायंकाळी मुस्लिम चालीरितीप्रमाणे निकाह कबूल करत हा अनोखा विवाहसोहळा पार पडला. यावेळी वधू-वराचे कुटुंबीय उत्साहाने सोहळ्यात सहभागी झाले होते.

हिंदुत्ववादी संघटना आणि पुरोहित संघटनांनी हा विवाह सोहळा लव्ह जिहाद असल्याचा आरोप केला होता. हिंदुत्ववादी संघटनांनी या लग्न सोहळ्या विरोधात समाज माध्यमांवर मोहिम राबवली. या मोहिमेला पुरोगामी संघटनांनी विरोध करत या लग्न सोहळ्याला संरक्षण देण्याचं जाहीर केलं. यामुळे हा लग्न सोहळा देशभर चर्चेत आला होता.

नाशिक येथील हा आंतरधर्मीय विवाह अगदी मोजक्या लोकांमध्ये पार पडला. हिंदु व मुस्लीम दोन्ही पध्दतीने हा विवाह लावण्यात आला. या विवाह सोहळ्यात मुलाचे मामा म्हणून अंनिसचे पदाधिकारी कृष्णा चांदगुडे उभे राहिले. यावेळी संविधानाला अभिप्रेत असणारी ही कृती असल्याचं समाधान कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Nashik Live
Top