Monday, 26 Jul, 11.22 am नाशिक LIVE

होम
द्राक्षाची बाग तोडून फेकली, कारल्यातून मिळवले लाखोंचे उत्पन्न

नाशिक लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । राज्यात विविध ठिकाणी पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, अशात येवल्यातील एका शेतकऱ्याने द्राक्षाची बाग तोडून शेतात कारले लावून त्यातून लाखो रुपयाचे उत्पन्न घेतले आहे.

राज्यात गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पडणाऱ्या या पावसामुळे सर्वच नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले होते. या मुसळधार पावसाने राज्यापुढे एक नवे संकट उभं राहिलं आहे.

मात्र अशापरिस्थिती एका शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळवलं आहे. येवला तालुक्यातील निमगाव मढ येथील शेतकरी नवनाथ लभडे यांनी आपल्या शेतातील द्राक्षाचा बाग तोडून त्याठिकाणी कारल्याचे पीक घेतले. त्यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळला आहे. शेतकरी नवनाथ लभडे यांनी एक एकर शेतामध्ये कारल्याचे पीक घेतलं होतं.

या कारल्याचे पिकाचे उत्पन्न घेण्यासाठी त्यांना 70 हजार रुपये खर्च आला होता. त्यांनी आतापर्यंत 350 कॅरेट कारले विकले आहे. त्यामुळे त्यांचा सर्व खर्च हा वसूल झाला आहे. तसेच यापुढे अडीच हजाराच्या आसपास कॅरेट कारले विकले, तर त्यातून त्यांना साडेचार ते पाच लाख रुपये उत्पन्न मिळेल, असे शेतकऱ्याचे म्हणणं आहे.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Nashik Live
Top